Accident : एकाच बाईकवरुन चौघे मित्र निघाले, वाटेत अपघात, तिघांचा मृत्यू! वाचलेला एक मित्र शॉकमध्ये

Sangli Accident News : कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते. हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते.

Accident : एकाच बाईकवरुन चौघे मित्र निघाले, वाटेत अपघात, तिघांचा मृत्यू! वाचलेला एक मित्र शॉकमध्ये
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 2:06 PM

सांगली : सांगलीत (Sangli Accident) भीषण अपघात झाला. अपघातात (Road Accident News) तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण थोडक्यात वाचलाय. पण तोही जखमी आहे. या अपघातात बचावलेला तरुणाला मोठा धक्का बसलाय. ही घटना घडली आहे. सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये. जत तालुक्यातील कोसारीमध्ये हा अपघात घडला. अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्यूनं संपूर्ण गावावार शोककळा पसरलीये. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील सर्व मृत हे तरुण होते. विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कोसारी गावात मृत्यू झालेल्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

कधीची घटना?

शनिवारी (4 मे) रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. जत तालुक्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. झालेल्या अपघातात तिघा मित्रांवर काळानं घाला घातला. तर एक जण गंभीर जखमी झाला.शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विजयपूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ ओढ्याजवळ हा अपघात झाला.

तरुणांवर काळाचा घाला

या अपघातात अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे, राजेंद्र भाले  हे तिघे ठार झालेत. तर संग्राम विक्रम तोरवे वय-16 हा जखमी झाला. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. कोसारी येथे पहाटे साडे पाच वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कोसारी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात?

कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते. हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते.

अपघातातील मृतांची नावं :

अजित नेताजी भोसले (वय 22)

मोहित शिवाजी तोरवे (वय 21)

राजेंद्र भाले (वय 22)

यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. घटनेचे गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. मात्र गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली. या अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.