सोन्याच्या संसाराला अचानक का कलाटणी? लव्ह मॅरेजचाही असा अंत का? सांगलीतल्या आत्महत्येनं खळबळ

3 वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह, सुखी संसाराला आता कशामुळे गालबोट? दिव्याच्या आत्महत्येनं सांगली हादरलं

सोन्याच्या संसाराला अचानक का कलाटणी? लव्ह मॅरेजचाही असा अंत का? सांगलीतल्या आत्महत्येनं खळबळ
विवाहिततेची लेकरांसह आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 12:57 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत (Sangli Sucide) तालुल्यात पळून जाऊन प्रेमविवाह (Love Marriage) केलेल्या एका महिलेनं आत्महत्या (Sangli crime) केली. आपल्या दोन कोवळ्या मुलांसह विवाहितेनं विहिरीत उडी टाकली आणि जीव दिला. या दोन्ही मुलांसह विवाहितेचाही दुर्दैवी अंत झाला. 3 वर्षांआधी पळून जाऊन लग्न केलेल्या या विवाहितेच्या सोन्यासारख्या संसाराला अचानक कलाटणी का मिळाली, असा प्रश्न या घटनेनं उपस्थित झालाय. अख्खा जत तालुका या घटनेनं हादरुन गेलाय. जत तालुक्यातील सिंदूर या गावात ही धक्कादायक घटना घडली.

जत तालुक्यातील सिंदूर गावात 23 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या केली. आपला एक मुलगा आणि मुलीसह तिने विहिरीत उडी टाकली. स्वतःच्या शेतातील विहिरीतच विवाहितेनं उडी मारत आत्महत्या केली. रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

दिव्या धनेश माडग्याळ, असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिला एक 9 महिन्याचा मुलगा होता. तर एक 2 वर्षांची मुलगी होती. तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन दिव्याने धनेश माडग्याळसोबत प्रेमविवाह केला होता. पत्नीनं केलेल्या आत्महत्येनं धनेश माडग्याळ यांना मोठा धक्काच बसलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह रात्री विहिरीत तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर रात्री हा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हसत्या खेळत्या घरातील तिघांच्या एकाएकी मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ माजलीय.

सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी एका तरुणाशी विवाह झाला होता. मात्र तिला तो पसंत नव्हता. त्यामुळे दिव्याने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर तिने प्रेम विवाह केला. धनेश माडग्याळ याच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केलं होतं.

दरम्यान, तिला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत दिव्याला गावी घेऊन आले होते. सिंदूर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर हे दाम्पत्य स्वतःच्या शेतात राहत होते. तिला एक मुलगी दिव्या, वय वर्ष 2 आणि श्रीशैल्य, वय वर्ष 9 महिने हा एक मुलगा होता.

प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर दिव्याच्या आईवडिलांशी दाम्पत्याचे वाद सुरु होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती. या वादातून त्यांचे सारखे खटके उडत होते. यातूनच तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर लगेचच तो ग्रामस्थांनी बाहेर काढला होता. रविवारी रात्री चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सांगोल्याच्या पथकाला बोलवून मुलगी आणि विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

तिघांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.