साबणावरून घडलं ‘महाभारत’, क्षुल्लक वादातून नवरा-बायको भिडले; अंगठाच फोडला

संसार म्हटलं की भांडण हे आलंच. प्रत्येक पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, काहीवेळा ते पेल्यातलं वादळ ठरत पण काही वेळा रौद्ररुप धारण करतं, ज्यात सगळंच उद्ध्वस्त होण्याची भीती असते. अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे, ज्यामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे मोठ्या वादात पर्यवसन झाले आणि पती-पत्नीने एकमेकांवर हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले

साबणावरून घडलं 'महाभारत', क्षुल्लक वादातून नवरा-बायको भिडले; अंगठाच फोडला
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 1:30 PM

संसार म्हटलं की भांडण हे आलंच. प्रत्येक पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, काहीवेळा ते पेल्यातलं वादळ ठरत पण काही वेळा रौद्ररुप धारण करतं, ज्यात सगळंच उद्ध्वस्त होण्याची भीती असते. अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे, ज्यामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे मोठ्या वादात पर्यवसन झाले आणि पती-पत्नीने एकमेकांवर हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले. साबणाच्या मुद्यावरून घरात अक्षरश: ‘महाभारत’ घडले, पतीने पत्नीच्या थोबाडीत मारली तर तिने त्याचा अंगठाच फोडला. आणि अखेर हा सगळा मामला पोलिसांत गेला.पतीच्या फिर्यादीवरुन पत्नीसह सासरच्या चौघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं झालं तरी काय ?

एवढं युद्ध होण्यासारखं नेमकं झालं तरी काय असा प्रश्न हे सगळं वाचून पडला असेल. तर हा मामला सांगलीच्या संजयनगरमध्ये 8 मे रोजी घडला. तर याप्रकरणी 13 मे रोजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मारुती चौगुले (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्याची पत्नी विद्या (वय 19), सासरा बाळू आप्पा कोळेकर, सासू लक्ष्मी, चुलत सासरा ज्ञानू आप्पा कोळेकर (सर्व रा. पाटणे प्लॉट, संजयनगर) यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

साबणावरून घडलं ‘महाभारत’

अशोक चौगुले हे हमाली करतात. सांगलीमधील संजयनगर येथे ते पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांसोबत एकत्र राहतात. घटनेच्या दिवशी, म्हणजेच 8 मे रोजी सकाळी अशोक यांची पत्नी विद्या अंघोळीसाठी बाथरूममध्ये जात होती, तेव्हा तिने तिच्या पतीला, अशोक यांना साबण कुठे आहे? अशी विचारणा केली. तो साबण बाथरुममध्ये असेल, जाऊन बघ असे अशोक यांनी पत्नीला सांगितले. तेव्हा त्यांची पत्नी विद्या भडकली आणि तिने पतीला उद्देशून अपशब्द वापरले. तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? अशी खोचक सवालही तिने विचारला. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला. अशोकने विद्याला शिवी दिली, तर विद्याने अशोकच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडने वार केला. मात्र या भांडणात सासरचेही मध्ये पडले आणि अशोक यांचे सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही अशोकला दमदाटी केली. मुलीला त्रास देतोस, तुला सोडतच नाही असे धमकावले. त्यानंतर अशोक यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अशोक यांची पत्नी आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.