Video: काय बाईए! एक दिवसाचं बाळ चक्क बॅगेतून पळवलं! नर्स असल्याचं भासवून चिमुरड्याची चोरी, ठिकाण- सांगली

Sangli Crime News : सांगलीच्या तासगावात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Video: काय बाईए! एक दिवसाचं बाळ चक्क बॅगेतून पळवलं! नर्स असल्याचं भासवून चिमुरड्याची चोरी, ठिकाण- सांगली
सांगलीत चोरी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 1:28 PM

सांगली : बाळ चोरी (Sangli News) होण्याच्या घटना महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. पण बाळ चोरीसाठी महिलेचं सांगलीत (Sangli Crime News) जे केलं, ते भयंकरच होतं. सांगलीत एका महिलेनं एक दिवसांचं बाळ चोरून नेलं. चक्क बॅगेत तिनं एक दिवसांच्या चिमुरड्याला कोंबलं आणि हॉस्पिटलमधून निघून गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. दरम्यान, हे बाळ ज्या महिलेचं होतं, तिच्या अश्रूंचा बांध फुटलाय. आपलं नवजात बाळ चोरीला गेल्यानं त्या आईची काय अवस्था झाली आहे, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी. आता या संपूर्ण चोरीप्रकरणी बाळ पळवणाऱ्या महिलेचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. या महिलेची ओळख पटवण्याचं काम सांगली पोलिसांकडून केलं जातंय. सध्या सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) पोलिसांच्या हाती लागलंय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला हॉस्पिटलमध्ये येताना आणि घाईघाईनं पळ काढताना कॅमेऱ्यात कैद झालीय.

नेमकं सांगलीत कुठं?

सांगलीच्या तासगावात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात नुकतीच एका महिलेचा प्रसूती झाली होती. दरम्यान, रविवारी सकाळी एक महिला या दवाखान्यात आली. लाल रंगाच्या साडीमध्ये या महिलेनं दवाखान्यात प्रवेश केला. दवाखान्यात येत असताना ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही कैद

दवाखान्यात गेल्यानंतर ही महिला नर्सचा वेश धारण करते. आपण नर्स असाल्याचं भासवते. त्यानंतर ही महिला प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमध्ये जाते. तिथून ती बाळाला आपल्या बॅगमध्ये टाकते आणि क्षणार्धात रुग्णालयातून पळ काढते. रुग्णालयातून बाहेर पडताना या महिलेची धावपळ पुन्हा त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाळ चोरी झालंय, हे ध्यानात आल्यानंतर प्रसूती झालेल्या आईसह रुग्णालय प्रशासनालाही मोठा धक्का बसलो. यानंतर पोलिसांत याप्रकरणी करण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूचं सीसीटीव्ही तपासून घेतलं असून त्यात बाळ चोरी करणारी महिला दिसून आलीय.

पाहा व्हिडीओ :

आता सांगली पोलिसांकडून या बाळचोरी प्रकरणी आरोपी महिलेची पोलिसांकडून ओळख पटवील जातेय. तसंच तिचा शोध घेण्यासाठी पथकंही तैनात करण्यात आली असून या महिलेला पकडण्याचं आणि एक दिवसाचं बाळ सुखरुप पुन्हा त्याच्या आईजवळ सोपवण्याचं आव्हान तासगाव पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.