पगार नाही मिळाला तर काय कराल? सांगलीत कर्मचाऱ्यांनी जे केलं, त्याने सगळेच चकीत!

सांगलीत अजब प्रकार! पगार मिळाला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी नेमकं असं केलं तरी काय?

पगार नाही मिळाला तर काय कराल? सांगलीत कर्मचाऱ्यांनी जे केलं, त्याने सगळेच चकीत!
अजब चोरीची, गजब घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 2:38 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : मालकाने पागर दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. सांगली जिल्ह्यातील्या विटामध्ये (Vita, Sangli) घडलेल्या या अजब चोरीप्रकरणी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. दोघा चोरट्यांना याप्रकरणी पोलिसांनी (Sangli crime News) अटक केली आहे. विटा पोलिसांनी (Vita Police) या चोरीप्रकरणी धडक कारवाई केली. 8 लाखापेक्षाही जास्तीची चोरी दोघांनी केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय.

सांगलीतील विटामध्ये सध्या एका अजब चोरीची चर्चा जोरात रंगलीय. 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर इथं असलेल्या जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. या चोरीमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये दहशत पसरली होती. तर संपूर्ण विटामध्ये खळबळ उडाली होती.

चोरट्यांनी जिओ मार्ट ऑनलाईन सेंटर दुकानाचं शटर फोटलं होतं. त्यानंतर सेंटरच्या आत प्रवेश करुन तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेत तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली होती.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी :

याप्रकरणी विटा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. विटा येथील उपलविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान, पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. त्यांच्या तपासातून दोघेही आरोप 21 वर्षांचे असून ते बलवडी इथं राहणारे आहेत.

दुकानातीलच कुणीतरी चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने तपास केला असता, अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्याच पोलिसांना यश आलंय. मनिष देवदास झेंडे, वय 21 आणि पवन मधुकर झेंडे, वय 21 अशा दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आलीय. या चोरी प्रकरणी पोलिसांनी रोख रकमेसह, एक दुचाकी आणि एक कपाटही जप्त केलंय. आरोपींनीही गुन्ह्याची कबुलीही दिलीय. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींनी पोलीस न्यायालयासमोर हजर त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.