पतीने मोबाईलचं लॉक उघडून दिलं नाही म्हणून पत्नीची गळफास घेत आत्महत्या

Sangli Suicide : शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला. मोबाईलचं लॉक काढून द्या, असा हट्ट ती भगवान यांच्याकडे धरू लागली. पण भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाईलचं लॉक काढून दिला नाही त्यामुळे मनिषा निराश झाली.

पतीने मोबाईलचं लॉक उघडून दिलं नाही म्हणून पत्नीची गळफास घेत आत्महत्या
आत्महत्येनं खळबळ...Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 4:17 PM

सांगली : बायको नवऱ्यावर कशामुळे रागवेल, याचा की नेम नाही. पण आता सांगलीतून आत्महत्येची (Sangli Suicide News) जी धक्कादायक घटना समोर आली आहे, ती काळजाचा थरकाप उडवणारीच आहे. मोबाईलचं लॉक (Mobile Lock) उघडून दिलं नाही, म्हणून एका विवाहितेनं जीव दिलाय. नवऱ्याने मोबाईलचं लॉक उघडून द्यावं म्हणून ही महिला सारखी हट्ट करत होती. पण नवऱ्याने दुर्लक्ष केलं. अखेर निराश झालेल्या बायकोनं घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे. बायकोला घरातील एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहून नवऱ्यालाही मोठा धक्का बसला. या घटनेनं परिसरातही एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात घडली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आत्महत्येची ही घटना घडकीस आली. त्यानंतर याबाबत पोलिसांनाही (Islampur Police, Sangli) कळवण्यात आलं. पोलिसांकडून सध्या या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

खळबळजनक!

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे इथं एका विवाहितेनं आत्महत्या घडल्यानं खळबळ माजलीय. मनिषा भगवान खोत असं मृत महिलेचं नाव आहे. काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगलीच्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी निवृत्त खोत यांनी फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

वाळवा तालुक्यातील शिरटे येथे सामान्य कुटुंबातील भगवान खोत हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अल्प शेती असल्याने भगवान खोत साखर कारखान्यात नोकरी देखील करायचे. नोकरी आणि शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवत होते.

शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा हिने घेतला. मोबाईलचं लॉक काढून द्या, असा हट्ट ती भगवान यांच्याकडे धरू लागली. पण भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाईलचं लॉक काढून दिला नाही त्यामुळे मनिषा निराश झाली. चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन तिने साडीच्या साह्याने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. सध्या पोलिसांकडून या आत्महत्याप्रकरणी पुढील तपास केला जातोय. या घटनेनं वाळवा तालुका हादरुन गेलाय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.