चव्हाण कुटुंबीयातील 12 वर्षांचा अंश पोहायला गेला, पण जिवंत परतलाच नाही!

सांगली येथील दुर्दैवी घटनेनं हळहळ! अंश चव्हाण या 12 वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?

चव्हाण कुटुंबीयातील 12 वर्षांचा अंश पोहायला गेला, पण जिवंत परतलाच नाही!
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 2:32 PM

सांगली : सांगली रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या एका डबक्यात बुडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचं नाव अंश चव्हाण असं आहे. या मुलाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. अंश आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंशचा जीव वाचवण्यात यश मिळू शकलं नाही. अंशच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

अंश चव्हाण हा 12 वर्षांचा मुलगा टिम्बर एरिया येथील नवीन वसाहतीमधल्या गुरुद्वाराजवळ राहायला होता. दुपारच्या सुमारास अंश आपल्या मित्रांसोबत गेला. मित्रांसोबत पोहण्यासाठी तो रेल्वे स्थानकाजवळी पाण्याच्या डबक्या उतरला होता.

सांगली रेल्वे स्थानकात खोदण्यात आलेल्या एका खड्ड्यात पाणी साचलं होतं. या पाण्यात तो मित्रांसह पोहत असताना अचानक बुडू लागला. अंश बुडत असल्याचं पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरु केला.

मुलांचा आरडाओरडा ऐकून अखेर स्थानिकांनी डबक्याच्या दिशेने धाव घेतली. नंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अखेर शोध मोहीम राबवून अंशचा मृतदेह डबक्याच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

रेल्वे विभागाकडून सांगली स्टेशन नजीक एक भाला मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यामध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याच खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरलेला नाही. याच वेळी पोहण्यासाठी गेला असता अंश याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं आता हळहळ व्यक्त केली जातेय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.