पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस दखल घेत नसल्यामुळे टोकाची भूमिका

पोलिस ठाण्याच्या अंगणात दोन महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमीन हडपल्याची पोलिस दखल घेत नसल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिस दखल घेत नसल्यामुळे टोकाची भूमिका
islampur police station (1)Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 12:56 PM

शंकर देवकुळे, इस्लामपूर : येथील कापूसखेड (Kapuskhed) रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी (Islampur police) दखल घेतली नाही. म्हणून नणंद-भावजयीने पोलिस ठाण्याच्या अंगणात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न (Attempted self-immolation) केल्याची घटना नुकतीच घडली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे अनर्थ टळला असल्याची माहिती मिळाली आहे. दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. पूजा ऋतुराज धुमाळे आणि आरती प्रवीण धुमाळे (३०, मूळ रा. चरण- बांबवडे, ता. शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. परंतु त्या सध्या कापुसखेड रोड, वीट भट्टीजवळ, इस्लामपूर) येथे राहत आहेत.

अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न

धुमाळे कुटुंबाचे कापूसखेड रस्त्यावर शेत आहे. सध्या या परिसरात प्लॉट पाडून जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार जोमात होत आहेत. बड्या राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसरात आपली मालमत्ता केली आहे. धुमाळे कुटुंबाच्या या जागेलगत असणाऱ्या एका बड्या कार्यकत्याने त्यांच्या १०९ गुंठे जागेला कुंपण मारण्यासाठी आज सकाळी खांब रोवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी माहिती अथवा त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संतापलेल्या आरती आणि पूजा या दोघींनी पोलिस ठाण्याच्या दारातच आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघींना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे शहर मोठं होतं आहे. जशी शहराची प्रगती होत आहे. त्याचबरोबर तिथल्या रस्त्यालगत असलेल्या जमिनीची किंमत सुद्धा मोठी झाली आहे. त्यामुळे जमिनी हडपण्याचा प्रकार सुरु आहे. जमिनी हडप करण्याचे आतापर्यंत अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.

Non Stop LIVE Update
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.