हो म्हणतेस की उडी मारु, प्रेमवीराची मैत्रिणीला धमकी, गच्चीवर नेमकं काय घडलं?

सहा महिन्यांची तिची ओळख, फ्रेंड बनली पुन्हा प्रेमाचे रंग उधळले. काही दिवसांनी तिने मोबाईलवर प्रेमाला नकार दिला. सांगलीचा प्रेमवीर रागाच्या भरात बोलत बोलत अपार्टमेंटवर पोहोचला. थेट शोले स्टाईल अपार्टमेंटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

हो म्हणतेस की उडी मारु, प्रेमवीराची मैत्रिणीला धमकी, गच्चीवर नेमकं काय घडलं?
सांगलीत प्रेमवीराचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 1:54 PM

सागंली: सहा महिन्यांची तिची ओळख, फ्रेंड बनली पुन्हा प्रेमाचे रंग उधळले. काही दिवसांनी तिने मोबाईलवर प्रेमाला नकार दिला. सांगलीचा प्रेमवीर रागाच्या भरात बोलत बोलत अपार्टमेंटवर पोहोचला. थेट शोले स्टाईल अपार्टमेंटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळं त्यााला जीवदान मिळाले. सहा महिन्यांपासून असणाऱ्या मैत्रिणीसाठी एकुलत्या एक मुलाने त्याच्या या कृत्यानं जन्मदात्या आईला वडिलांना प्रचंड मानसिक धक्का दिला. गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असणाऱ्या दीपक ठोंबरे या कर्मचाऱ्यांच्यामुळे त्याला जीवदान मिळाले. हे ऐकून आई-वडिलांनी अश्रू ढाळत पोलिसांचे आभार मानले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या प्रेमवीर तरुणाला पोलिसांनी जीवदान दिले. सांगली जिल्ह्यात या घटनेची एकच चर्चा सुरु होती.

मैत्रिणीचा नकार प्रेमवीर थेट गच्चीवर

मैत्रिणीने प्रेमाला नकार दिल्याने प्रेमवेडा तरुण थेट राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जावून संरक्षक भिंतीवर चालत होता.व्हिडीओ कॉल करून मैत्रिणीकडून प्रेमाला होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता. पण तिने प्रेमाच्या रिलेशनला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असे सुनावले.मग थेट तरुणाने आरडाओरडा करत आत्महत्येची धमकी दिली. इस्लामपूरातील पेठ रस्त्यावरच्या विलासराव पाटील पंपाच्या पाठीमागे पाटील इस्टेट या तीन मजली इमारतीच्या छतावर हा प्रकार घडला. इथं हा तरुण भाडयाने वास्तव्यास आहे.

पोलिसांच्या सतर्कतेनं वाचला जीव

व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधताना तुला काय करायचे ते कर ? असे सांगणाऱ्या तरुणीला तो भीती दाखवत होता. तेव्हा काही तरुणांनी पोलीस यांना कळवले. पोलीस तातडीने धाव घेत प्रसंगावधान राखून बिल्डिंगच्या छतावर धाव घेतली. निराश होऊन आत्महत्येचा विचार बोलून दाखवणाऱ्या तरुणाला बोलण्यात गुंतवून त्यास ताब्यात घेतले. आणि त्याचे मनपरिवर्तन केले. तरुणाचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांचं जमलेल्या लोकांनी कौतुक केले. त्या प्रेमवेड्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणले आणि त्याचे समुपदेशन केले.

पोलिसांनी त्या तरुणाच्या आई वडिलांना बोलावून घेत घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. संबंधित तरुण अवघ्या वीस वर्षाचा आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत येथील एका कॅफेत कुक म्हणून काम करतो. त्याचे कुटुंबीय जयसिंगपूर येथे वास्तव्यास आहेत. तो मूळचा नेर्ले येथील आहे. आई- वडिलांना या घटनेची माहिती थेट पोलीस ठाण्यात आल्यावर समजली. तेथे मुलाच्या या कृत्याने आई-वडिलांनी अश्रू ढाळले.आईने धुणी-भांडी करून तुला मोठे केलेय यासाठीच का ? असे खडे बोल पोलिसांनी त्याला सुनावले.

इतर बातम्या:

चिपी विमानतळाच्या लोकार्पणापूर्वीच मानापमान नाट्य?; दरेकर म्हणतात, फडणवीस आणि मला कार्यक्रमाचं साधं निमंत्रणही नाही

अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात

Sangli islampur Youth trying to commit suicide after his girl friend denied love proposal police rescue youngster and counselling him

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.