Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप माजी नगरसेवकाच्या खुनाचा खरा सूत्रधार भाजप माजी नगरसेवक, संपूर्ण जिल्ह्यात चर्चा

ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. यापप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता.

भाजप माजी नगरसेवकाच्या खुनाचा खरा सूत्रधार भाजप माजी नगरसेवक, संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
criminal umesh sawantImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:29 PM

सांगली : सांगलीच्या (Sangali) जत (jath) तालुक्यातील भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड (vijay tad) यांच्या खून प्रकरणी अखेर पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा मुख्य सूत्रधार हा भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत (criminal umesh sawant) असल्याचं उजेडात आलं आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला आहे ते अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितलं आहे. खूणी कोण असल्याचं उजेडात आल्यापासून संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. नेमका खून का करण्यात आला याची पोलिस आता चौकशी करणार असल्याची माहिती समजली आहे.

सांगलीच्या जत तालुक्यात 17 मार्च रोजी भर दिवसा भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हयात खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. यापप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता. यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आणि अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर खून करणाऱ्या चौघा जणांना अटक केली आहे. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयिताची नावे आहेत, तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत,अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.