सांगलीत उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्यांकडून स्वत:च्याच सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचा आरोप

बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून पांडुरंग काळे या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. (Sangli Pandurang Kale Murder)

सांगलीत उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्यांकडून स्वत:च्याच सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचा आरोप
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 6:30 PM

सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचलं आहे हे पाहायला मिळते. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. (Sangli Kawathemahankal Borgaon Gram Panchayat Election Pandurang Kale murder )

भाजपच्या पक्षाच्या सदस्याचा खून

बोरगाव गावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. पांडुरंग काळे हे  भाजपचे  सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर जखमी

पांडुरंग काळे यांचा खून झाला असून या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये होणारं राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचलंय हे बघायला मिळते. उपसरपंच निवडीवरुन ही घटना घडल्याची माहिती आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी केला खून?

पांडुरंग काळे यांचा उपसरपंचपदाच्या निवडीच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख घटनास्थळी दाखल झालेले आहेत.कांही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे अधिक तपास सुरू आहे

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीचा भाजपला पहिला झटका, नेते कल्याण काळे घड्याळ बांधणार?

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

Video : अंकिता लोखंडेचा आणखी एक डान्स व्हिडीओ व्हायरल; सुशांतच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडावर डोकं आपटून खून, आरोपीला बारा तासात अटक

(Sangli Kawathemahankal Borgaon Gram Panchayat Election Pandurang Kale murder)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.