मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, डॉ. जाधवच्या पोलीस कोठडीत वाढ, अकाऊंटंट महिलेलाही बेड्या

डॉक्टरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ झाली आहे. तर रुग्णालयाच्या अकाउंटंट निशा पाटील यांनाही मिरज पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, डॉ. जाधवच्या पोलीस कोठडीत वाढ, अकाऊंटंट महिलेलाही बेड्या
डॉ. महेश जाधव
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 1:05 PM

सांगली : 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सांगलीतील डॉक्टर महेश जाधव (Dr Mahesh Jadhav) याच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. तर अकाऊंटंट महिलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी सुनील आंबोळे यांनी मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली होती. सखोल चौकशी करुन डॉ महेश जाधवसह सात जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. (Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Police custody increases Lady Accountant arrested)

काय आहे प्रकरण?

मिरजेतील अपेक्स हॉस्पिटलमधील 87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर महेश जाधवने या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तपासासाठी डॉ महेश जाधव याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर डॉक्टरच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ झाली आहे. तर रुग्णालयाच्या अकाउंटंट निशा पाटील यांनाही मिरज पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांनाही सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

6 दिवसांची पोलीस कोठडी

मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलमधल्या 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करत डॉक्टर महेश जाधवला अटक केली होती. यानंतर न्यायालयाने जाधवला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

अकाउंटंट निशा पाटलांनाही अटक

रुग्णालयातील अनेक बाबींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. यातून रुग्णालयातील अकाउंटंट निशा पाटील यांनाही गुरुवारी मिरज पोलिसांनी अटक केली. तर अटकेत असलेल्या महेश जाधव याच्या पोलीस कोठडीत आणखी सहा दिवसाने वाढ झाली आहे. तर निशा पाटील यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिरज न्यायालयाने सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक

नांदेडच्या धान्य घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला ED कडून अटक, अनेक अधिकारी जाळ्यात येण्याची शक्यता

(Sangli Miraj Apex Care Hospital Dr Mahesh Jadhav Police custody increases Lady Accountant arrested)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.