VIDEO | कर्नाटकातून सांगलीत वाहतूक, मिरजेत 90 पोती गुटखा जप्त
सांगलीत गुटखा माफियांवर जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. कर्नाटकमधून सांगलीकडे वाहतूक करणारा गुटखा पकडून पोलिसांनी जोरदार दणका दिला.
सांगली : मिरजमधील गांधी चौकी पोलिसांनी गुटखा माफियांना चांगलाच दणका दिला आहे. पवन बाबू नावाचा 90 पोती गुटखा सांगलीत जप्त करण्यात आला. सांगली पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Sangli Miraj Police detains 90 packets of tobacco from Karnataka)
कर्नाटकातून गुटख्याची वाहतूक
मिरजेतील महात्मा गांधी चौकीचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी नुकतेच डॉक्टर महेश जाधवला जेरबंद केले. मिरजेत कोव्हिड रुग्णालयाच्या नावाखाली रुग्णांचा बळी घेणारा वैद्यकीय क्षेत्रातील गलथान कारभार पोलिसांनी उजेडात आणला. ही घटना ताजी असतानाच गुटखा माफियांवरही जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. कर्नाटकमधून सांगलीकडे वाहतूक करणारा गुटखा आज पकडून पोलिसांनी गुटखा माफियांना जोरदार दणका दिला आहे.
सापळा रचून गाडी अडवली
बजाज मॅक्स गाडीतून गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी डीबी पथकाचे बाबू निळे आणि अमोल आवळे यांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा फुले चौक येथे सापळा रचून पथकाने बजाज मॅक्स हे वाहन अडवले. व्हॅनमध्ये कुरकरेच्या पोत्यामागे गुटख्याची पोती लपवलेली आढळून आली.
वाहनचालकाला अटक, गुटखा जप्त
पोलिसांनी वाहन चालक अल्ताफ रमजान मुलानी (रा. शामराव नगर, सांगली) याला अटक केली आहे. 1 लाख 80 हजार रुपये किमतीचा 90 पोती पवन बाबू गुटखा, बजाज मॅक्स वाहन असा तीन लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी कारवाईची माहिती दिली आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या :
मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक
मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, डॉ. जाधवच्या पोलीस कोठडीत वाढ, अकाऊंटंट महिलेलाही बेड्या
(Sangli Miraj Police detains 90 packets of tobacco from Karnataka)