Sangli Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांना चाहूल लागली अन्…

शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली दुसराच गोरखधंदा सुरु होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि याचा पर्दाफाश झाला.

Sangli Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांना चाहूल लागली अन्...
सांगलीत स्पा सेंटरवर छापेमारी करत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 12:45 PM

सांगली / 8 ऑगस्ट 2023 : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास सांगली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून पाच महिलांची सुटका केली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ एका अपार्टमेंटमध्ये हा धंदा सुरु होता. याप्रकरणी जागा मालकाला अटक केली आहे, तर एजंट फरार झाला आहे. विक्रम पंडित कल्याणकर असे अटक जागा मालकाचे नाव आहे. तर इम्रान युनुस मुल्ला असे फरार एजंटचे नाव आहे. याबाबत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे लपून वेश्याव्यवसाय सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

छापेमारीत पाच महिलांची सुटका

पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना सांगली मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळच असलेल्या कल्याणकर प्लाझामधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये स्पा सेंटर, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाची खातरजमा केली. मग या स्पा सेंटरवर छापा टाकला. छापेमारीत स्पा सेंटरमधील पाच महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु

सदर जागेचा मालक विक्रम कल्याणकर याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार एजंटचा शोध घेत आहेत. पोलील अटक आरोपीचीही कसून चौकशी करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरु असलेल्या गोरखधंदा सुरु असल्याचे उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.