शेअर मार्केटद्वारे सव्वा कोटींचा गंडा, व्हिएचएस कंपनीचा संचालकाला अखेर बेड्या

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लोकांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मग ना परतावा दिला ना गुंतवणूक केलेली रक्कम दिली.

शेअर मार्केटद्वारे सव्वा कोटींचा गंडा, व्हिएचएस कंपनीचा संचालकाला अखेर बेड्या
शेअर मार्केटच्या नावे फसवणूक करणारा जेरबंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 12:12 PM

सांगली / शंकर देवकुळे : आटपाडी येथे शेअर मार्केटद्वारे सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणूक प्रकरणी आटपाडीतील व्हीएचएस कंपनीचा संचालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. संतोष ढेमरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांना गंडा घातला होता. सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

अनेकांची फसवणूक करुन फरार झाला होता

संतोष ढेमरे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने टीएचएस ट्रेडर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत अनेक आटपाडी परिसरातील अनेक नागरिकांनी ढेमरे याच्या कंपनीत गुंतवणूक केली. लोकांनी नफा कमावण्याच्या लालसेपोटी तब्बल 1 कोटी 27 लाख रुपये ढेमरे यांच्या कंपनीत गुंतवले.

नागरिकांनी आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली

मात्र नफा तर नाहीच मिळाला, पण गुंतवणूक केलेली रक्कमही मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आटपाडी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. नागरिकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोष ढेमरेसह संदीप धोंडिराम ढेमरे, विनोद दादासाहेब कदम, हारुण इस्माईल तांबोळी यांच्यावर आटपाडी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

पुण्यातून सापळा रचून अटक केली

गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संतोष ढेमरे हा फरार होता. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास संशयित संतोष हा पुणे येथील बिबवेवाडी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बिबवेवाडी येथे सापळा रचून ढेमरे याला अटक केली. आरोपी संतोष ढेमरे यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.