आधी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा दाखल केला, मग गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी, अखेर तरुणाने…

सांगलीत गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच घडलेल्या एका भयंकर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आधी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा दाखल केला, मग गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी, अखेर तरुणाने...
सांगलीत ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने जीवन संपवले
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 3:07 PM

सांगली : सांगलीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. खोट्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी पैशाचा तगादा लावल्याने एका तरुणाने नैराश्येतून जीवन संपवल्याची घटना सांगलीत घडली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर जवळ ही घटना घडली. महेश सुभाष जाधव असे 25 वर्षीय पीडित तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी विटा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत आरोपींवर गुन्हा दाखल करत तात्काळ अटकेची मागणी केली. यानंतर विटा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. यातील सरपंच अंकुश ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपींनी महेश जाधव याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता. यानंतर हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी तरुणाकडे 5 लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर ‘तुझे लग्न होणार नाही, तुला न्यायालयात बघून घेतो’, अशी धमकी देत होते. यामुळे तरुण नैराश्येत राहत होता. याच नैराश्येतून त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. महेश भाऊ केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहे.

ही घटना उघड होताच नातेवाईक आणि ग्रामस्थ संतापले. राजकीय हेतूने आरोपींनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे. यानंतर तरुणाचा मृतदेह विटा पोलीस ठाण्यासमोर ठेवत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. आरोपींवर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत, एकाला अटक केली आहे. यानंतर गावकरी शांत झाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.