87 कोरोनाबाधितांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अॅपेक्स हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टराला बेड्या
कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे (Sangli Police arrest Apex Hospital chief doctor for causing death of 87 corona patients).
सांगली : कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मिरजेच्या अॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव असून महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे (Sangli Police arrest Apex Hospital chief doctor for causing death of 87 corona patients).
अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड हेळसांड, पोलिसात गुन्हा दाखल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत उपचारासाठी मिरजेतील अॅपेक्स हॉस्पिटलला कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात रुग्णांची हेळसांड, त्यातून मृत्यू आणि अधिक बिले आकरल्याचा प्रकार समोर आला होता. रुग्णालया विरोधात अनेकांनी तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी याप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर महेश जाधव याच्यासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांचा तपास सुरु असताना 87 जणांचा मृत्यू
या प्रकरणाचा तपास सुरु असताना हॉस्पिटलमध्ये 205 रूग्णांवर उपचार सुरु होता. त्यापैकी तब्बल 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. तसेचत रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने महात्मा गांधी चौक पोलिसांकडून याबाबत सखोल तपास करण्यात आला. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली (Sangli Police arrest Apex Hospital chief doctor for causing death of 87 corona patients).
पुण्याकडे पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला अटक
रुग्णालयात कोरोना नियमावलीप्रमाणे उपचार करण्यात आले नाही. कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटरची आणि अद्यावत अशी सुविधा उपलब्ध नसताना देखील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय शिकाऊ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे सगळे उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याकडे पसार होणार्या डॉक्टर महेश जाधव याला कासेगाव याठिकाणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
आधी मायलेक, आता पतीचाही मृतदेह, काय घडलं ‘त्या’ रात्री? गूढ आणखी वाढलं
लग्नानंतर पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, पतीला संशय, महिलेने प्रियकराच्या मदतीने काटा काढला