सांगली पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 8 कोटी गोठवले, नेमकं प्रकरण काय?

सांगली पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. सांगली पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना मोठा झटका दिला आहे. आरोपींचे तब्बल आठ कोटी रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारवाईचं सांगलीत कौतुक होत आहे.

सांगली पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 8 कोटी गोठवले, नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 10:52 PM

सांगली | 11 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सध्या प्रचंड वाढल्या आहेत. कुणी फोन करुन आपण अमूक कंपनीमधून बोलतोय असं सांगून लुबाळतंय तर कुणी ओटीपी मागून परस्प बँकेतून पैसे लंपास करत असल्याच्या घटनादेखील बघायला मिळाल्या आहेत. या घटना एककीडे प्रचंड वाढ असताना या घटनांवार आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे सांगली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सांगली पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या नांग्या ठेचल्या आहेत. सांगली पोलिसांनी या टोळीचे बँकेतील तब्बल पाउणे आठ कोटी रुपये गोठवले आहेत.

संबंधित टोळी ही एक कंपनी चालवत होती. ही टोळी कंपनीच्या नावाने सर्वसामान्यांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडायची. त्यासाठी पैशांची दुप्पट परतफेड मिळेल, अशी आमिष दाखवली जायची. पण नंतर ही टोळी लाखो आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायची. अखेर या टोळीचा पापाचा घडा भरला आणि पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यातील पैसेच गोठवले आहेत.

आरोपी हे टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणूक करायचे. ते टेलिग्रामवर चॅटिंग करायचे. त्यातून ते नागरिकांना दुप्पट पैशांचे अमिष दाखवायचे. त्यानंतर ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायचे. पण या टोळीच्या आरोपींचे फ्रॉड बँक अकाउंट सांगली पोलिसांनी गोठवली आहेत. वेगवेगळ्या 27 बँकांमधील 7 कोटी 81 लाख रुपये गोठवण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वास पाटील या इसमाला आरोपींनी फसवलं होतं. पाटील हे आरोपींच्या दुप्पट पैशांच्या आमिषाला बळी पडला. ग्रुपवर ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पाटील यांना वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यात रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पाटील यांनी 21 लाख 10 हजार रुपये गुंतवले. यादरम्यान आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली.

सांगलीच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास केला. पोलिसांनी तपास करत फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या 27 वेगवेगळ्या बँक खाते आणि त्यातील 7 कोटी 81 लाख गोठवली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे जादा पैसे मिळवण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

कॅपिटलएक्स टेलीग्राम ग्रुप व इतर टेलिग्राम वरून अशा प्रकारची जर कोणाची फसवणूक झाली असेल, त्यांनी सांगली सायबर पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक तेली यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.