सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli) स्कूल बस अपघात (School Bus Accident) झाला. या अपघातात सात ते आठ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना सोडायला जाणारी स्कूल बस पलटी होऊन हा अपघात झाला. मिरज (Miraj) कुरणे मळा सिध्येवाडीत हा अपघात झाला. स्कूल बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रम सुटल्यामुळे हा अपघात ङडला. यावेळी स्कूलमध्ये 25 ते 30 विद्यार्थी होते. ही घडना घडल्याचं कळल्यानंतर पालकांनाही मोठा धक्का बसला होता. तर जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. स्कूल बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच हा अपघात घडला, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मात्र आता अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी पालिकांकडून शाळेला जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्कूल बस जात होती. मिरजण कुरणे मला सिध्येवाडीतील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी ही बस निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट शेतात जाऊन पलटी झाली. एकूण 25 ते 30 विद्यार्थी यावेळी बसमध्ये होते. त्यांना या अपघातात मार बसला. तर 7 ते 8 विद्यार्थ्यांना जखम झाली.
स्कूल बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये मयूर गुरव, संभव चावला, श्रद्धा पाटील, हर्षद पाटील यांच्या इतरही काही विद्यार्थी जखमी झाले.जखमी विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघातानंतर स्कूल बसचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला.दरम्यान, चालक दारु पिऊन गाडी चालवत होता, असा संशय काही प्रत्यक्षदर्शींनी केला. आता शाळा प्रशासनाने या पुढे आशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी काळजी घ्यावी आणि जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
या अपघातात बाबात वैभव चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आमच्या गावची मुलं मातोश्री दगडू खाडे हायस्कूल, मालगाव इथं जातात. गाडी मुलांना घरी सोडायला येतात सिध्येवाडी इथं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारात बस पाच ते सात फूट खाली कोसळली आणि हा अपघात झाला. शाळेच्या व्यवस्थापकांनी बदली ड्रायव्हर देताना चौकशी करुनच द्यावा, अशीही मागणी वैभव चव्हाण यांनी केली आहे.
CCTV : तिघा मैत्रिणींच्या चालत्या लोकलमधून एकामागोमाग एक उड्या! असं का केलं तिघींनी? Video बघाच
नागपुरात रेती चोरांचा कहर, महसूल कर्मचाऱ्यांवर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न; 16 जणांवर गुन्हे
तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ