Sangli Murder : दारुड्या बापाला मुलगा वैतागला, धारदार कोयत्यानं भर चौकात बापाला भोसकला! सांगलीत खळबळ
Sangli Murder : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप या ठिकाणी ही खळबळजनक घटना घडली.
सांगली : सांगलीत (Sangli Crime News) मुलानेच वडिलांची भर चौकात कोयत्याने भोसकून हत्या (Sangli Murder) केली आहे. या हत्येने सांगलीत खळबळ माजली आहे. बापाची बत्या केल्यानं मुलगा स्वतःत पोलीस ठाण्यात हजर झाला होता. गी घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडली आहे. 54 वर्षांच्या वडिलांना दारु पिण्याचं व्यसन होतं. व्यसनाधीन वडिलांच्या त्रासाला वैतागलेल्या मुलानं टोकाचं पाऊल उचललं. भर चौकात कोयत्यानं सपासप वार करत या मुलानं वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. मुलानं केलेले सपासप वार बापाच्या जीवावर उठले. गंभीर घाव झाल्यानं जखमी अवस्थेतील वडिलांचा खून झालाय. भर चौकात घडलेल्या या रक्तरंजित घटनेनं संपूर्ण वाळवा तालुकाच हादरुन गेलाय.
नेमकी कुठं घडली घटना?
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप या ठिकाणी ही खळबळजनक घटना घडली. व्यसनाधीन वडीलांच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलानेच वडिलावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरेश भीमराव पाटील (वय 54) यांचा मृत्यू झाला.
हल्यानंतर मुलगा प्रथमेश पाटील वय वीस वर्षांचा तरुण स्वतःहून कुरळप पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना कुरळप पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भर चौकात घडली.
आईच्या आत्महत्येचा बदला?
सुरेश भीमराव पाटील हे गावातील एका खाजगी दूध संस्थेत सचिव म्हणून अनेक वर्षापासून काम करत होते. मात्र त्यांना गेल्या अनेक वर्षापासून दारूचे व्यसन होते. यातून ते कुटुंबाला सतत त्रास देत होते.
या त्रासाला कंटाळून पत्नीने पंधरा वर्षांपूर्वी पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आजी आजोबा या मुलांचा सांभाळ करत होते. वडील मात्र व्यसनाच्या आहारी जाऊन सतत कुटुंबाला त्रास देत होते.
धारदार कोयत्यानं सपासप वार
मंगळवारी (31 मे) दारू पिऊन सुरेश पाटील हे कुरुळप गावातील चौकात कट्ट्यावर बसलेले होते. या दरम्यान त्यांचा मुलगा प्रथमेश याने येऊन वडीलाच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या नंतर मुलगा जवळच असणाऱ्या पोलिस ठाण्यात हजर झाला.जखमी वडीलास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखम खोलवर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलला पाठवले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी अधिक तपास पोलीस स्टेशन करीत आहे.