सांगलीत तलाठ्यानंतर अप्पर तहसीलदारही जाळ्यात, कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याने अटक

माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने कारवाई केली होती. यामध्ये माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

सांगलीत तलाठ्यानंतर अप्पर तहसीलदारही जाळ्यात, कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याने अटक
तलाठी विशाल उदगिरे (डावीकडे), अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 11:45 AM

सांगली : जत तालुक्यातील परागंदा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला (Hanamant Mhetre) अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हेत्रेला अटक केली. म्हेत्रेच्या सांगण्यावरुन लाच घेताना दोन दिवसांपूर्वी माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला (Vishal Udgire) रंगेहाथ अटक करण्यात आली होती. (Sangli Talathi Upper Tehsildar arrested in Jat Bribe Case)

माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने कारवाई केली होती. यामध्ये माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. मात्र संख येथील अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे त्यावेळी पसार झाले होते.

सापळा रचून म्हेत्रेला अटक

तासगाव मणेराजुरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घराची झाडाझडती केली. यावेळी सापळा रचून म्हेत्रेला अटक करण्यात आली. कोर्टाने त्याची 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार शेतात माती वाहतूक करत असताना वीस दिवसांपूर्वी अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे यांनी वाहनावर कारवाईच्या अनुषंगाने संख अप्पर तहसिलदार कार्यालयात वाहने लावली होती. या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी आणि वाहने सोडण्यासाठी दोघांनीही तक्रारदारकडे दोन लाख 50 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने 5 जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संबंधित बातम्या :

101 जमिनीचे तुकडे, 1 हेलिकॉप्टर ताब्यात, शिवालीक ग्रुपच्या मालकीची 81 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई

नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या

(Sangli Talathi Upper Tehsildar arrested in Jat Bribe Case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.