शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात सर्वदूर मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच पावसादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. एका 36 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू (Lighting Death) झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (Sangli Kavathe Mahankal Rain) तालुक्यातील गावात घडलेल्या या घटनेनं एक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी इथं एका व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळली आणि 36 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं नाव बापू अर्जुळ नराळे असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली. बापू नराळे हे आपल्या घरी परतत होते. त्यावेळी जीवघेणी वीज काळ बनून त्यांच्या अंगावर कोसळली.
बापू नराळे हे दुचाकीवरुन घरी परतत होते. ते त्यांच्या शेतात होते. मुसळधार पाऊस सुरु झाल्याने ते नरळे वस्तीवरील घराकडे जायला निघाले. यावेळी वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. वीज अंगावर पडताक्षणी ते जागच्या जागी कोसळले. रस्त्यावर त्याचा मृतदेह पडून होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं शरीर हे काळं पडलं होतं.
बापू यांच्या मृत्यूची बातमी कळताच नरळे कुटुंबीयांच्या पायाखालीच जमीनच सरकली. सकाळी घरातून बाहेर गेलेली व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेवर विश्वास ठेवणं त्यांना जड गेलं. बापू नराळे यांच्या मृत्यूने नराळे कुटुंबियांच्या मनावर मोठा आघात झालाय. या धक्क्यातून आता कसं सावरायचं, असा प्रश्न त्यांना पडलाय.
बापू नराळे यांच्या मृत्यूने त्यांचं अख्खं कुटुंब पोरकं जालं. बापू नराळे यांची बायको, मुलांचा तर आधार हिरावला आहेत. पण आई आणि दोन भावंडांवरीलही छत्र हरपलंय. बापू नराळे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवास आहे, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आता उभा ठाकलाय. या घटनेनं संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातल हळहळ व्यक्त केली जातेय.