सांगलीच्या महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतल्या कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक, पोलीस आरोपींच्या मुसक्या कशा आवळणार?

पौर्णिमा पाटील या सांगलीमधील उत्तर शिवाजी नगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली नावाने आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्ष, डाळिंब, नारळ, तांदुळ मालाची खरेदी करुन निर्यात करतात.

सांगलीच्या महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतल्या कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक, पोलीस आरोपींच्या मुसक्या कशा आवळणार?
सांगलीच्या महिला व्यावसायिक पौर्णिमा पाटील
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 5:08 PM

सांगली : द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या सांगलीच्या महिला व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने तब्बल 1 कोटी 36 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबईतील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पौर्णिमा पाटील या सांगलीमधील उत्तर शिवाजी नगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली नावाने आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्ष, डाळिंब, नारळ, तांदुळ मालाची खरेदी करुन निर्यात करतात. 2019 मध्ये दुबईतील ओपीसी फुडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल याने मोबाईलवरुन संपर्क साधून मालाची चौकशी केली.

पौर्णिमा पाटील दुबईत संबंधित कंपनीला भेट देण्यासाठी गेल्या

पौर्णिमा यांनी कंपनीविषयी सारी माहिती दिली. त्यावेळी दिलीप जोशी हा मुंबई परिसरासाठी काम पहात असल्याचे जलाल याने सांगितले. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर 2019 मध्ये जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संशयित मंगेश गांगुर्डे हा भारतातील काम पाहत असल्याने त्यावेळी ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेट देण्यासाठी दुबईला गेले. त्यावेळी कंपनीचा मालक मुहम्मद फारुक, बद्र अहमद हुसेन यांच्यासोबत ओळख झाली.

फक्त 30 टक्के रक्कम मिळाली

माल निर्यातीसाठी पन्नास टक्के रक्कम आगाऊ आणि मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार जानेवारी 2021 मध्ये ऑर्डर मिळाली. द्राक्षाचे चार आणि डाळिंबाचे तीन असे सात कंटेनर निर्यात करण्यात आले. त्याची किंमत 1 कोटी 57 लाख रुपये इतकी होती. त्यावेळी 30 टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली. उर्वरित रक्कमेसाठी जलाल यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्याने चालढकलपणा करण्यास सुरुवात केली.

पौर्णिमा यांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार

पौर्णिमा पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार दुबईतील कंपनीच्या दोघा मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

चार जणांविरोधात गुन्हा दाखल

दुबईतील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारुक, बद्र अहमद जुमा हुसेन (रा. दुबई) या दोघांसह मुंबईतील व्यवस्थापक दिलीप जोशी (मुंबई), व्यवस्थापक माजीद जलाल (रा. दुबई), अर्थसहाय प्रमुख मंगेश गांगुर्डे (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपींच्या मुसक्या कशाप्रकारे आवळणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :

आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट

VIDEO : काय करावं नेमकं? केडीएमसी एकीकडे खड्डे भरत नाही, अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेली झाडाची कुंडी चोरटे सोडत नाही

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.