मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार, खळबळजनक माहिती समोर

सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला गर्भपातासाठी कर्नाटकात नेलं. तिथे गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह सांगलीत आणण्यात आला. नातेवाईकांकडून महिलेचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी महिलेचा मृतदेह शहरभर फिरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार, खळबळजनक माहिती समोर
मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 4:09 PM

गर्भपातासाठी कर्नाटकमध्ये गेलेल्या एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मृत महिलेच्या माहेरच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सासर आणि सांगलीच्या मिरजेतील माहेर असणारी 32 वर्षीय महिलेची गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती. नंतर गर्भपात करण्याचा निर्णय माहेरच्या लोकांसह गर्भवती महिलेने घेतला. त्यांनी थेट कर्नाटक राज्यातल्या बागलकोट येथील महालिंगपूरमधील एक हॉस्पिटल गाठलं. मात्र गर्भपात करताना सदर महिलेचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूचे कारण देण्यासाठी दाखला गरजेचा होता. पण संबंधितांच्याकडून देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे कुटुंबियांकडून मृत्यू दाखला मिळवण्यासाठी महिलेचा मृतदेह घेऊन सांगली आणि मिरजेत तीन तास मृतदेह घेऊन भटकंती करण्यात आली.

या दरम्यान सांगली पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता हा सर्व गर्भपात मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.