नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरात एक खुनाची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या मेरी वसाहतीत घडलेल्या खुनाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या संजय वायकंडेंचा गळा आवळून हत्या झाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या झाल्याची बाब उघडकीस आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही बाब घडली असून अद्याप खुनाचा गुन्हा दाखल झाला नसून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पंचवटी पोलीसांनी दिली आहे. संजय यांची बायको गावावरुन घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याने हत्या कुणी केली याचा शोध नाशिकच्या पंचवटी पोलिसांना घ्यावा लागणार आहे. दरम्यान, मेरीच्या वसाहतीत आणि घरी येऊन संजय वायकंडे यांचा खून कुणी केला याबाबत शासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मेरीच्या वसाहतीत राहणाऱ्या संजय वायकंडे यांची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे.
मेरी वसाहतीत राहणाऱ्या संजय वायकंडे हे नाशिकच्या जलसंपदा विभागात क्लार्क म्हणून कार्यरत होते.
दिवाळीच्या निमित्ताने संजय यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या, त्यानंतर त्या गावावरून घरी आल्यानंतर संजय हे बेडरूम मध्ये पडलेले होते.
दरम्यान, संजय यांना एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेलेले असतांना त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. ‘
संजय यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता.
मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली असून या घटणेने खळबळ उडाली आहे.
पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून घटनास्थळी पंचवटी पोलीसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण होणार आहे.