या डान्सरनं हुंड्यात कार मागितली…; पोलिसांनी थेट गुन्हाच केला दाखल…
सपना चौधरीचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आता पुढे येत आहे. तर तिच्याविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्लीः एकीकडे हरियाणवी गायिका सपना चौधरी तिच्या नृत्यामुळे जगभरातील लोकांचे मनोरंजन करते. तर दुसरीकडे मात्र जाणूनबुजून किंवा नकळत वादात अडकत आहे. नुकतेच डान्सर सपना चौधरीच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा कोणी नोंदवला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात सपना चौधरीसह तिची आई आणि भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी लोकप्रिय डान्सर सपना चौधरीविरुद्ध फरीदाबादमधील पलवल महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सपनाच्या कुटुंबीयांकडून हुंड्यानध्ये क्रेटा कारची मागणी करून दबाव निर्माण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता हा गुन्हा नेमका कोणी नोंदवला आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र या प्रकरणामुळे आता तिच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
सपना चौधरीचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आता पुढे येत आहे. तर तिच्याविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खरं तर, 2018 मध्ये, सपना चौधरीला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सादर करायचा होता. त्यासाठी प्रेक्षकांनी 300 रुपयांची तिकिटेही खरेदी करून कार्यक्रमासाठी हजर झाले होते.
त्यावेळी मात्र सपना चौधरी कार्यक्रमाला पोहोचलीच नाही. त्यानंतर मात्र तिच्यावर टीकाही झाली आणि तिच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला.
सपना चौधरीचे हरियाणामध्ये स्टेज परफॉर्मन्स देतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले. त्यानंतर ती रातोरात स्टार बनली.
तिची लोकप्रिय गाणीही सर्वत्र ऐकायला मिळतात. लग्नापासून ते पार्ट्यांपर्यंत सपना चौधरीची गाणी आजही जोरदार टिकून आहेत. तिने हरियाणाला केवळ देशातच नव्हे तर जगभरात नाव मिळवून दिले आहे आणि तिच्या चाहत्यांचीही संख्या काही कमी नाही.