बीड हादरलं, परळीमध्ये अजित पवार गटाच्या सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या
Bapu Aandhale Murder : बीडमध्ये मराठा-ओबीसी समाजामध्ये संघर्ष सुरू असताना एक धक्कादायक बातमी सुरू समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सरपंचावर गोळीबार झाला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळीमधील सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. बापू आंधळे यांच्या हत्येमागेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी सरपंचकीची निवडणूक लढवली होती. परळीमधील बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाला आहे.
शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बापू आंधळे यांच्यावर हल्लेखोरांनी पाच फायर राऊंड केले. या गोळीबारामध्ये सरपंच बापू आंधळेंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परळी तालुका हादरला असून घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. हा गोळीबार कोणी केला आणी हत्येमागचं कारण काय याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली आहे.