आधी खून नंतर जाळलं, युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात खळबळ
जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात युवतीचा खून करून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केले आहे. मृत युवतीचे वय अंदाजे 22 ते 25 एवढे असून ही घटना 13 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सातारा : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात युवतीचा खून करून मृतदेह जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केले आहे. मृत युवतीचे वय अंदाजे 22 ते 25 एवढे असून ही घटना 13 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Satara 22 year old young girl murdered found half burnt in drainage pipeline police file case)
ड्रेनेज पाईपमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला एका युवतीचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळला. महामार्गालगत असलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये हा मृतदेह आढळला. सापडलेल्या मृत युवतीचे अंदाजे वय हे 22 ते 25 वर्षे आहे. हा मृतदेह अर्धवट जळाला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता आहे.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा अंदाज
या घटनेची महिती समजताच खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच घटनास्थळावरुन काही पुरावे मिळतात का याचीसुद्धा पोलिसांनी चाचपणी केली. घटनास्थळाची तसेच मृतदेहाची माहिती घेऊन युवतीचा 13 जूनच्या रात्री खून करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, मृतदेहाचे पोस्ट मॉर्टम झाल्यानंतर आणखी गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती खंडाळा पोलिसांनी दिली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी या घटनेसंबंधी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.
इतर बातम्या :
मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड
नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या
लग्नाच्या आमिषाने बलात्कार, औरंगाबादच्या कथित बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप
(Satara 22 year old young girl murdered found half burnt in drainage pipeline police file case)
शिवसेनेला चार कारकुन सांभाळणार असतील तर मला कधीही मान्य होणार नाही; राज ठाकरेंचे शब्दच ‘सेनावापसी’ रोखणार?https://t.co/E8UcJ4cihL#rajthackeray | #mns | #Maharashtra | #mahavikasaghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021