Satara Crime : साताऱ्यात पोलिसांवरच दोघांचा चाकू हल्ला! अखेर दोघा हल्लेखोरांना अटक
Satara News : कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावर डीपी भोसले कॉलेजसमोर काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली

सातारा : साताऱ्यात (Satara Crime News) पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Attempt to murder) करण्यात आला. हा हल्ला चुकवण्यात पोलिसांना यश आलं. हा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलं असून आता त्यांच्यावर कारवाई गेली जाते आहे. या दोघांची कसून चौकशी पोलीस करत आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांनी पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसंच हल्ल्यादरम्यान, वापरण्यात आलेला धारदार चाकू देखील पोलिसांनी (Satara Police) जप्त केला आहे. सोबत हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता सर्व प्रकरणाता तपास सातारा पोलिसांकडून केला जातोय. पूर्व वैमनस्यातून पोलिसांवर हा हल्ला झाला होता, अशी प्राथमिक माहितीही समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावर डीपी भोसले कॉलेजसमोर काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. हातात चाकू घेऊन बाईकवरुन दोघे आले. दोगांनी पोलिसांनी हटकल्याच्या कारणावर चाकू हल्ला केला. निर्भया पथकातील पोलिसांवर चाकूने हल्ला करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सुदैवानं पोलिसांनी प्रसंगावधान राखलं. त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात वाचले. या हल्ल्यानंतर परिसराच एकच घबराट उडाली होती.
पाहा व्हिडीओ :




कुणी केला हल्ला?
बाईकवरुन येत चाकू घेऊन हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. सादिक सलीम शेख आणि सनी जाधव अशी दोघा अटक केलेल्यांची नावं आहे. सातारा पोलिसांना या दोघांवरही हल्लाप्रकरणी गुन्हा नोंदवून घेता असून आता त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणाची पुढील कारवाई केली जातेय.