Satara Rape : सातारा हादरलं! लिंबू डोक्यावर फिरवून जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार, नराधमाला अटक

Satara Crime News : मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला आणि भुरळ पडून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला.

Satara Rape : सातारा हादरलं! लिंबू डोक्यावर फिरवून जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार, नराधमाला अटक
साताऱ्यात खळबळ...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 2:03 PM

सातारा : साताऱ्यातून (Satara Crime News) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीवर बलात्कार (Satara Rape) करण्यात आला असून बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा करण्यात प्रयत्न झाला. ही धक्कादायक आणि संताप आणणारी घटना उघडकीस आल्यानंतर साताऱ्यात हादरुन गेलंय. या प्रकरणी पीडित तरुणीने आपल्या तक्रारी खळबळजनक आरोप केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या आरोपांच्या आधारे आता पोलिसांनी (Satara Police) एकावर गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास केला जातो आहे. तसंच संशयित आरोपी असलेल्या नराधमास अटकही करण्यात आलीय. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सध्या केली जातेय. साताऱ्यातल्या एका कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात या बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास केला जातो आहे.

एकटीला रुममधे नेलं, आणि…

साताऱ्यातल्या एका कॉलनीत मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवला आणि भुरळ पडून तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडित तरुणीने आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या सातारा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

याआधी नराधमाने असंच केलंय?

साताऱ्यात उघडकीस आलेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी 375 आणि 201(3) प्रमाणे संशयित आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलाय. पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याआधीही नासीर शेख यांनी अशाचप्रकारे इतरही तरुणींसोबत गैरकृत्य केलेलं असण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.