Jaykumar Gore | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई

जयकुमार गोरेंसह पाच जणांवर फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मयत माणसाला जिंवत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज केल्याचा ठपका गोरेंवर ठेवण्यात आला आहे.

Jaykumar Gore | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई
जयकुमार गोरेंकडून मृत मागासवर्गीय व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्नImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 2:06 PM

सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रोसिटी (Atrocity) प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार (Satara BJP MLA) आहेत. जयकुमार गोरेंसह पाच जणांवर फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मयत माणसाला जिंवत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज केल्याचा ठपका गोरेंवर ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक, जो मयत आहे, त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे.  दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे

माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता, तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.

कोण आहेत जयकुमार गोरे?

  • जयकुमार गोरे हे 2014 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते
  • 2009 आणि 2014 असे दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले होते
  • 2009 मध्ये अपक्ष तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती
  • माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका महत्त्वाची ठरली होती
  • काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही माणमध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नव्हता
  • जयकुमार गोरे यांनी सोलापुरात महाजनादेश यात्रेत अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला

संबंधित बातम्या :

जयकुमार गोरे-शेखर गोरे पुन्हा आमनेसामने, एकमेकांविरोधात गुन्हे 

भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!

सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.