मुलीला भूतबाधा झाल्याचा बनाव, वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू, दोन भोंदू बाबांना साताऱ्यात अटक

साताऱ्यात भोंदू बाबामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे (Minor Girl Died Due To Superstition).

मुलीला भूतबाधा झाल्याचा बनाव, वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू, दोन भोंदू बाबांना साताऱ्यात अटक
Crime News
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 8:35 AM

सातारा : साताऱ्यात भोंदू बाबामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे (Minor Girl Died Due To Superstition). या प्रकरणी जादु टोणा कायद्यातर्गत रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारयातील दहिवडी येथील शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे (Minor Girl Died Due To Superstition).

याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. उत्तम अवघडे आणि रामचंद्र अवघडे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात कुटुंबाचे कोणतेही सहकार्य होत नसल्याने अनिसने गुन्हा दाखल केला.

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातील दहिवडी येथील शिंदी गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 14 वर्षाच्या मुलीवर भुतबाधा झाली असल्याच्या कारणावरुन वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युनंतर आई-वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर दहिवडी येथे पुरला.

या प्रकरणात दोन भोंदू बाबांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम अवघडे आणि रामचंद्र अवघडे अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. आई वडिलांनी मुलीला ताप आलेला असताना गोंदवले येथील देवऋषाकडे जाऊन उपचार केले होते. यावेळी मुलीला भुतबाधा झाली असल्याचे देवऋषींनी सांगितले होते (Minor Girl Died Due To Superstition).

गेल्या आठवड्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्य झाला. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत स्वत:हा दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुलीचे नातेवाईक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. याची सखोल चौकशीची मागणी अनिसने केली आहे.

Minor Girl Died Due To Superstition

संबंधित बातम्या :

‘अल्लाचा प्रकोप होईल’ अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.