रात्री रेसिडन्सीला आग लागली, पाहतात तर काय आतमध्ये दोन तरुणांचे मृतदेह; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
सुभाषकुमार प्रसाद हा कोरेगावमध्ये फरसी बसवण्याचे काम करत असे. तो ऋषिकेशच्या भावाच्या हॉटेलमध्ये काम करत असे. गेल्या पाच महिन्यांपासून सुभाषकुमार हा हॉटेलमध्ये काम करतो.
सातारा : ऋषिकेश ताटे आणि सुभाषकुमार प्रसाद हे दोन मित्र होते. ऋषिकेश हा कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी येथील. तर सुभाषकुमार हा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील बोधेवाडी येथील मुळचा रहिवासी. दीड वर्षांपासून या दोघांची मैत्री आहे. सुभाषकुमार प्रसाद हा कोरेगावमध्ये फरसी बसवण्याचे काम करत असे. त्याचा मामा राजस्थानला निघून गेला. त्यानंतर तो ऋषिकेशच्या भावाच्या हॉटेलमध्ये काम करत असे. गेल्या पाच महिन्यांपासून सुभाषकुमार हा हॉटेलमध्ये काम करतो. रात्रला ते दोघे ज्या ठिकाणी होते त्या फ्लॅटला आग लागली. त्यामुळे खळबळ उडाली.
रेसिडन्सीला लागली आग
सुभाषकुमार जळगाव नाका परिसरात रुमवर राहत असे. ऋषिकेशचा भाऊ रोहन गावात यात्रा असल्यामुळे १९ मार्चला मूळ गावी गेले होते. ऋषिकेशचे कुटुंबीय वाई देईल सुरूर येथे देवदर्शन करून आले. त्यानंतर ऋषिकेशची आई, भाऊ कोरेगावला आले. त्यानंतर ऋषिकेश आणि त्याचा मित्र फ्लॅटवर आले होते. २० मार्चला पहाटे साडेतीनच्या सुमारास अनन्या रेसिडन्सीच्या तिसऱ्या मजल्याला आग लागल्याचे कळले.
दोघांचेही मृतदेह सापडले
लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. फ्लॅटच्या आतमध्ये सुभाषकुमार याचा मृतदेह लटकत होता. बेडरुमच्या दाराच्या आत ऋषिकेश हा जळालेल्या अवस्थेत होता. ऋषिकेश ताटे (वय ३०) याचा होरपळून मृत्यू झाला. तर सुभाषकुमार प्रसाद (वय २०) याने गळफास लावला. या दोघांनी स्वतःला का संपवले याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दोघेही गे असल्याची माहिती
पोलीस तपासानंतर हे स्पष्ट होईल. ऋषिकेशचा भाऊ मोहन ताटे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही गे होते. जीवन जगून काय करणार, या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले असावे. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन मित्रांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास दोघांनीही आत्महत्या केली. ऋषिकेश ताटे आणि त्याचा मित्र सुभाषकुमार प्रसाद असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. यामध्ये ऋषिकेशने स्वतः पेटवून घेतले तर सुभाष कुमारने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण सध्या अस्पष्ट आहे. याचा तपास कोरेगाव पोलीस करत आहेत.