Satara Firing : सातारा गोळीबार प्रकरण, मदन कदमसह चार आरोपींना अटक

साताऱ्यात जुना वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरु असताना अनुचित प्रकार घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. चर्चा सुरु असतानाच शिवसेनेचा माजी नगरसेवक मदन कदम याने गोळीबार केला.

Satara Firing : सातारा गोळीबार प्रकरण, मदन कदमसह चार आरोपींना अटक
पाटण गोळीबार प्रकरणी चौघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 6:15 PM

सातारा / संतोष नलावडे : पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख मदन कदम हा मुख्य आरोपी आहे. पवनचक्कीच्या व्यवहाराच्या जुन्या वादातून आणि गाडीच्या अॅक्सिडेंटवरुन यांच्यात वाद सुरु होता. यासाठी मदन कदम याच्या घरी काही लोकं गेले होते. यावेळी केलेल्या गोळीबारात 2 जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणातील आरोपींवर 302 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गावात शांतता रहावी म्हणून बैठका घेतली असल्याचं साताऱ्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांनी सांगितलं.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु

श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तर प्रकाश जाधव असे जखमीचे नाव आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमी प्रकाश सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मदन कदम हा मूळचा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील आहे.

जुना वाद मिटवण्यासाठी आले आणि जीवानीशी गेले

रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली. जुना वाद मिटवण्यासाठी सर्व मदन याच्या घरी गेले होते. वादावर चर्चा सुरु असतानाच रागाच्या भरात मदने गोळीबार केला. यात कोरडे वाडी पाटण येथील श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर मदन कदमने तेथून काढता पाय घेतला.

हे सुद्धा वाचा

या घटनेमुळे गावात एकच कल्लोळ माजला. गावकऱ्यांनी मदन याच्या घराला वेढा घालत त्याला ताब्याच देण्याची मागणी केली. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव जमावाची समजूत काढली. यानंतर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.