प्रेमी युगुलांची आंतरजिल्हा टोळीकडून लूटमार,सातारा पोलिसांनी चित्तथरारक पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

वीर धरणावर पर्यटनासाठी आलेल्या प्रेमी युगुलासंह पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शिरवळ पोलिसांनी केला आहे. Shirval Police arrested six gangster

प्रेमी युगुलांची आंतरजिल्हा टोळीकडून लूटमार,सातारा पोलिसांनी चित्तथरारक पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
शिरवळ पोलीस
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 7:33 PM

सातारा: सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नदीच्या किनारी आणि वीर धरणावर पर्यटनासाठी आलेल्या प्रेमी युगुलासंह पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शिरवळ पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 1 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Satara Shirval Police arrested six gangster who looted travellers)

पर्यटकांना लुटणारी आंतरजिल्हा टोळी

सातारा जिल्हयात वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांसह सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत होत्या. कुकरी आणि चाकूसारख्या घातक शस्त्रांचा धाक पर्यटकांना दाखवून लुटमार सुरु होती. हे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना शिरवळ पोलिसांनी चितथरारक पाठलाग करून पकडले.

पोलिसांची गस्त आणि टोळीचा भांडाफोड

लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांच्याकडून गस्त घालण्याचे काम सुरु होते. पोलिसांना संशयितरित्या दुचाकीवर फिरणारे युवक आढळले. पोलिसानी त्या युवकांना हटकले असता संबंधितानी तेथून पळ काढला. यावेळी शिरवळ पोलिसांनी पळून जात असलेल्या दुचाकीचा पाठलाग करत सराईत गुन्हेगारांना अखेर ताब्यात घेतले. संशयित युवक हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यांच्याकडुन एकूण सुमारे 1 लाक 56 हजार रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

सातारा पोलिसांकडून 5 तासात खुनाचा उलगडा

सातारा शहरातील खंडोबाच्या माळावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मंगळवारी एक मृतदेह आढळल्यानं साताऱ्यात एकच खळबळ उडाली होती. माळावर काही नागरिक गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत हा गुन्हा उघडकीस आणला होता. याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच साक्षीदार आणि गोपनीय माहितीद्वारे जळालेला मृतदेह हा रामनगर येथील आकाश राजेंद्र शिवदास (20) वर्षीय तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीचे कोणाशी वैर किंवा भांडणतंटे आहेत काय, याची माहिती घेत गुन्ह्याचा उलगडा केला.

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये मनसे नेत्याची आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

धक्कादायक! साताऱ्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ

(Satara Shirval Police arrested six gangster who looted travellers)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.