भयानक ! नातेवाईकाने गुंगीचे औषध दिलं अन् शाळकरी मुलीवर…

दलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचार असो किंवा अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाने शाळकरी मुलीचा केलेला विनयभंग... डोक्यात तिडीक जाणाऱ्या हे भयानक प्रकार समोर येत असतानाच आता पुण्यातही एक अतिशय दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालंय. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारं पुण सध्या गुन्ह्यांमुळेच जास्त गाजतंय.

भयानक ! नातेवाईकाने गुंगीचे औषध दिलं अन् शाळकरी मुलीवर...
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 9:11 AM

राज्यात महिला-मुलींचे आयुष्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न सध्या पडू लागला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून दररोज अत्याचाराच्या भयानक घटना उघडकीस येताना दिसतात. बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचार असो किंवा अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाने शाळकरी मुलीचा केलेला विनयभंग… डोक्यात तिडीक जाणाऱ्या हे भयानक प्रकार समोर येत असतानाच आता पुण्यातही एक अतिशय दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालंय. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारं पुण सध्या गुन्ह्यांमुळेच जास्त गाजतंय. काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलींवर ज्येष्ठ नागरिकांनी अत्याचार केल्याची प्रकरणं उघडकीस आली होती, त्यामुळे पुण हादरलेलं असतानाच आता अशीच एक वाईट घटना घडलीये.

पुण्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचर करण्यात आला असून नात्यातील एका नराधम तरूणानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. शाळेतील तक्रार पेटीतून या भयानक कृत्याचा उलगडा झाला असून त्यामुळे संपूर्ण शाळाच हादरली आहे. पीडित मुलीच्या आईला या घटनेसंदर्भात समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे, या निर्धाराने त्या मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्थानक गाठून तेथे सर्व प्रकार कथन करत फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 वर्षीय तरूणाला अटक केली आहे, धक्कादायक गोष्ट म्हणजे तो तरूण त्या मुलीच्या नात्यातीलच आहे. त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ज्येष्ठ नागरिकाचा 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

हे सुद्धा वाचा

एका 78 वर्षांच्या नराधम वृद्धाने अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याने त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत, जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मधुकर पिराजी थिटे असे 78 वर्षीय गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.या घटनेत सातवर्षीय पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित वृद्धाला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध नराधमाने चिमुकल्या मुलीला खाऊचं आमिष दाखवलं आणि तिला घरी नेलं. तेथे नेऊन तिने तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून गळ्याला चाकू लावला. तसेच, घरी किंवा पोलिसांना सांगितल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

तर दुसऱ्या घटनेत आणखी एका ज्येष्ठ नागरिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. 70 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिचा विनयभंग केला. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्या नराधमांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.