घनकचरा प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याणमधील उंबर्डे घनकचरा प्रकल्पातील सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाण प्रकरणी 9 जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनकचरा प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण-डोंबिवली महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 7:30 PM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व सुरक्षा रक्षक कंत्राटदार पद्धतीने नेमले आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक केबीनमध्ये बसले होते. दरम्यान पांढऱ्या रंगाची गाडी जबरदस्तीने आत आली आणि काही जण गाडीतून उतरले आणि एका रक्षकाला मारहाण केली. याच मराहाणीचे सीसीटीव्ही व्हायरल झाले असून, यात कल्याणमधील माजी नगरसेवक दिसत आहेत. दरम्यान, याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 9 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण करताना शिवसेनेचे माजी नगरसेवक सीसीटीव्हीत कैद

अशोक निकम, सचिन पाटील, ऋतिक अभिषेक, दिनेश शर्मा अशी मारहाण करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे आहेत. सुरक्षा रक्षकांना मारहाण करताना शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र भोईर यांनी मारहाणीबाबत स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. घनकचरा प्रकल्पामुळे दुर्गंधी पसरली होती, याचा जाब विचारण्यासाठी स्थानिक नागरिक गेले होते. त्यावेळी नागरिक आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी मी गेलो होतो, असे भोईर यांनी सांगितले.

मारहाणीत सुरक्षा रक्षक जखमी

या मारहाणीत सचिन पाटील आणि ऋतिक अभिषेक यांना हाताने चापट्या मारल्या, तर दिनेश शर्मा यांना लाकडी दांडक्याने फटका मारुन जखमी केले. त्यानंतर तीन दुचाकींवरुन आलेल्या सहा जणांनी पुन्हा सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पुन्हा इथे दिसायचे नाही, असा सज्जड दमही दिला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमक्या कोणत्या कारणातून सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली, याबाबत खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच मारहाणीचे खरे कारण उघड होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.