नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून सोमवारी वरिष्ठ आयएएस (IAS Officer) अधिकारी जितेंद्र नारायण (Jitendra Narayan) यांच्यावर धडक कारवाई करुन त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नारायण यांच्यावर एका महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. नारायण यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंदमान आणि निकोबार पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून गुन्हेगारी प्रकरणात एफआयआर नोंदवून स्वतंत्र कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
निवेदनानुसार, मंत्रालयाला 16 ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार पोलिसांकडून नारायण आणि इतरांनी द्वीपसमूहाचे मुख्य सचिव म्हणून काम करत होते.
त्यावेळी एका महिलेचा कथित लैंगिक छळ केल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत कडक धोरण स्वीकारत महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंधित घटनांबाबत सरकार कोणतीही गोष्ट सहन करणार नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे..
या प्रकरणात एका 21 वर्षीय महिलेने आयएएस अधिकारी जितेंद्र नारायण यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तेव्हा ते ते अंदमान निकोबारमध्ये मुख्य सचिव पदावर कार्यरत होते.
या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात तिच्यावर दोनदा सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही विनंती केली आहे.
महिलेने सांगितले की ती नोकरी शोधत होती आणि कोणीतरी तिची हॉटेलवाल्यामार्फत आरएल ऋषीशी ओळख करून दिली होती.
त्यानंतर तो तिला आयएएस अधिकारी जितेंद्र नारायण यांच्या घरी घेऊन गेला. आयएएस अधिकाऱ्याच्या घरी गेल्याव पहिल्यांदा महिलेला दारुची ऑफर देण्यात आली.
मात्र दारु पिण्यास नकार दिल्यावर मात्र तिला नोकरीचे अश्वासन देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला गेला. जितेंद्र नारायण हे एजीएमयूटी कॅडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.