वसईमध्ये विकृताची दहशत, अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्याची माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून बक्षीस जाहीर

वसई, विरार तसेच नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत पसरली आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच सर्वांनी सावध आणि सतर्क रहावे असे आवाहनही केले आहे.

वसईमध्ये विकृताची दहशत, अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्याची माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून बक्षीस जाहीर
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 2:31 PM

नालासोपारा | 24 नोव्हेंबर 2023 : वसई विरार शहरातून एक धक्कादायय माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या विकृताची शहरात दहशत पसरली आहे. हा विकृत आरोपी अल्पवयीन मुलींना रस्त्यात गाठून त्यांना आडोशाला नेऊन त्यांचा विनयभंग करतात. गेल्या दोन महिन्यात या भयानक प्रकाराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये, पालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तुळींज पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींचे फोटो प्रसिद्ध करत सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केले आहे.

दोन दुर्दैवी घटनांमुळे पसरली घबराट

वसई-विरार, नालासोपार शहरांमध्ये सध्या या विकृतांमुळे घबराट निर्माण झाली आहे. शाळेत, क्लासला, दुकानात सामान आणायला जाणाऱ्या एकट्या दुकाट्या अल्पवयीन मुलींना गाठून,त्यांचा जबरदस्तीने विनयभंग करण्यात आले. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.

यातील पहिली घटना 5 ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना 15 नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये अनुक्रमे 7 आणि 9 वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग केला आहे. घडलेल्या प्रकारामुळे भेदरलेल्या या मुलींनी घरी धाव घेत पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर या घटना उघडकीस आल्या, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकरणात दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावध रहा, सतर्क रहा

पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथकेही तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचे फोटो मिळवू, ते ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच जी कोणी व्यक्ती या संशयित आरोपींची माहिती देईल, त्यांना बक्षीस देण्यात येईल असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. रस्त्याने जाताना सर्वांनीच सावध रहावे, आणि सतर्क रहावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.