रस्त्याच्या बाजूला असलेल्या तुम्ही मांस घेतलं आहे का? जर तुम्ही नेहमी त्याच्याकडून घेत असाल तर हरकत नाही. मात्र अचानक नवीनच कोणीतरी स्पेशल मांस म्हणून गोमांस किंवा डुकराचं मांस विकत असेल तर वेळीच सावध व्हा. संबंधित मांस विकणारा तुम्हाला स्पेशल मांस म्हणून मानवी मांसही विकू शकतो. याबाबत एका सीरिअल किलरने रस्त्याच्या बाजूला त्याने मारलेल्या लोकांचं मांस विकलं होतं.
हा किलर अमेरिकेतील मेरीलँड तुरुंगात बंदिस्त असलेल्या असून त्याचं नाव जोसेफ रॉय मॅथेनी असं आहे. 90 च्या दशकात त्याने हे हत्याकांड करत त्या लोकांच मांस रस्त्यात्या बाजूला विकलं होतं. मेरीलँड तुरुंगात त्याचीच कोणीतरी हत्या केलीये. त्याच्या हत्येमुळे त्याने 90 च्या दशकात केलेले हत्याकांड चर्चेत आलं आहे.
पोलिसांच्या चौकशीत मॅथेनी यांनी पुलाखाली झोपलेल्या दोघांना कुऱ्हाडीने तुकडे केल्याचं मान्य केलं होतं. 23 वर्षाच्या कॅथी स्पायसर आणि ऐन मैग्जिनर 39 यांच्यासह अनेक मुलींना त्याने घरी बोलावत त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवत त्याने त्यांचीच हत्या केली होती. हत्या केलेल्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने विकले होते.
जोसेफ रॉय मॅथेनीने चौकशीदरम्यान सांगितलं की त्याने मारलेल्यांपैकी कोणासोबतही त्याचं वैर नव्हतं. लोकांना मारून त्याला आपण सर्वांपेक्षा शक्तीशाली असल्यासारखं वाटायचं.
मॅथेनीला त्याची पत्नी 6 वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली होती. तेव्हापासून त्याने आपले दु:ख कमी करण्यासाठी क्रूरपणे लोकांना मारत सुटला होता.