Crime : ‘तो’ फक्त वैश्या व्यवसाय करणाऱ्या तरूणींना मारायचा, पोलिसांना पाठवायचा अर्धी किडनी… धक्कादायक घटना समोर!
हत्या केल्यानंतर तो वैश्यांची किडनी, गर्भाशय, हृदय, मेंदू काढून पोलिसांना पाठवायचा. या सिरियल किलरच्या मनात वैश्याबद्दल इतका राग होता की तो वैश्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत, त्या तुकजे आजूबाजूला फेकायचा.
Serial killer murder story : जगात अनेक सीरिअल किलर होवून गेले आहेत. यामधील अनेक स्टोरी अशा होत्या की त्या ऐकून अंगावर थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. असाच एक सीरिअल किलर जो वैश्यांना मारून त्यांच्या शरीराचे तुकडे करायचा. हत्या केल्यानंतर तो वैश्यांची किडनी, गर्भाशय, हृदय, मेंदू काढून पोलिसांना पाठवायचा. या सिरियल किलरच्या मनात वैश्याबद्दल इतका राग होता की तो वैश्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत, त्या तुकडे आजूबाजूला फेकायचा.
कोण होता तो सीरिअल किलर?
खुनशी सिरिअल किलर ‘जैक द रिपरने’ केलेल्या पहिल्या हत्येनंतर स्वतःच लंडनच्या एका वृत्तपत्राला पत्र लिहून माहिती दिली होती. या पत्रानंतर खळबळ उडाली होती. या पत्रात त्याने केलेल्या हत्येचे वर्णन करत अजून हत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. 1888 साली या सीरिअल किलरने लंडनच्या ह्याइडचैपलमध्ये धुमाकुळ घातला होता. नंतर तो सीरिअल किलर ‘ जैक द रिपर’ यावाने ओळखला जावू लागला.
वैश्या म्हणून काम करणाऱ्या महिलांचा त्याच्या डोक्यात इतका राग होता की तो लंडनच्या रेड लाइट परिसरात काम करणाऱ्या वैश्यांचा इतक्या निर्दयपणे खून करुन त्यांच्या शरीराचे तुकडे पोलिसांना पाठवत असे. त्याने 31 ऑगस्ट 1888 ला मेरी एन निकोलस नावाच्या वैश्येची हत्या केली आणि तिची अर्धी किडनी काढून पोलिसांना पाठवली.
सीरिअल किलरने एक एक करत 5 वैश्यांचा खून केला. त्या सर्वांना मारण्याचा पॅटर्न सारखाच होता. त्यांचा गळा कापायचा नंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करायचे. किडनी, गर्भाशय. ह्यदय, मेंदू काढून पोलिसांना पाठवायचे. यावरुन सीरिअल किलरला डॉक्टरकीचे नॉलेज असणार हे नक्कीच..
जॅकच्या उलट्या काळजाला बळी पडलेल्या महिलांमध्ये मैरी एन निकोल्स, एनी चैपमैन, एलिजाबेथ स्ट्राइड, कैथरीन एडवाइस आणि मैरी जेन केली यांचा समावेश होता.
100 वर्षानंतर झालेला खुलासा
दरम्यान, या सिरिअल किलींगला 100 वर्ष उलटल्यानंतर यात मोठा खुलासा झाला होता. पोलिसांना सिरिअल किलरचा थांगपत्ता कधीच लावता आला नाही. पण, 100 वर्षानंतर वैज्ञानिकांनी डीएनएच्या आधारावर सीरिअल किलरचा शोध लावला होता. या सीरिअल किलरची ओळख डीएनएच्या आधारावर 23 वर्षांचा न्हावी एरन कॉसमिंस्की म्हणून झाली आहे. ज्याचा मृत्यू 1919 मध्ये झाला होता.