Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरीत डान्स बारवर छापा; समाजसेवा शाखेच्या धडक कारवाईत 17 महिलांची सुटका

मुंबईत छुप्या पद्धतीने डान्स बार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ठिकाणी छापेमारीही केली.

अंधेरीत डान्स बारवर छापा; समाजसेवा शाखेच्या धडक कारवाईत 17 महिलांची सुटका
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 12:38 AM

मुंबई : मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पुन्हा एकदा डान्स बार छुप्या पद्धतीने चालवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. विशेषतः पश्चिम उपनगरात अशा बेकायदा कृत्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अंधेरीत कारवाई करून डान्स बारचा छुपा बाजार उठवला. अंधेरी पूर्वेकडील परिसरात असलेल्या डान्स बारवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत डान्स बारच्या मॅनेजरसह 18 जणांना अटक करण्यात आली. तसेच डान्स बारमधून एकूण 17 महिलांची सुटका केली गेली. समाजसेवा शाखेने ही कारवाई केल्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण अंधेरी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला छापा

अंधेरी परिसरात डान्स बार चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री समाजसेवा शाखेचे पथक त्या बारवर पोचले. कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. बार चालकाला कुठलीही कुणकुण लागू नये म्हणून नागरिकांच्या वेशातील पोलिसांनी श्रुती बारमध्ये शिताफीने प्रवेश करीत छापा टाकला. या कारवाईत बार चालकाकडून तब्बल 1.20 लाख रुपयांची रोख रक्कम, लॅपटॉप, स्पीकर, अॅम्प्लीफायर आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आले.

डान्स बार कर्मचाऱ्यांसह आठ ग्राहकांना अटक

पोलिसांच्या पथकाने डान्स बारवर कार्यरत रोखपाल, व्यवस्थापक, सात वेटर, एक ऑर्केस्ट्रा कलाकार आणि आठ ग्राहकांना अटक केली आहे. त्याचबरोबर बारच्या परिसरातून 17 पीडित महिलांची सुटका करण्यात पोलीस पथकाने यश मिळवले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार रूम्सशी संबंधित अश्लील डान्स प्रतिबंधक कायदा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाऱ्या 2016 मधील कायद्यांतर्गत कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.