Satara Crime : साताऱ्यात दहशत माजवणाऱ्या बकासूर गँगला अटक, दरोड्याचा गुन्हा दाखल
या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन मुले अल्पवयीन आहेत. या टोळीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा : सातारा शहरातील महाविद्यालयीन युवकांमध्ये दहशत माजवणारी ‘बकासूर गॅंग‘ (Bakasur Gang) शाहूपुरी पोलिसांनी अटक घेतली आहे. या गॅंगचा विस्तार संपूर्ण राज्यभर असल्याचे सोशल मीडिया (Social Media)वरून स्पष्ट होत आहे. साताऱ्यातील कला व वाणिज्य कॉलेज येथे कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन विद्यार्थ्याला लुटल्याप्रकरणी ‘बकासूर गॅंग’ च्या 8 जणांविरोधात दरोड्या (Robbery)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, हत्याराने दहशत करून गर्दी, मारामारी करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला करत आहेत.
आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी
कला व वाणिज्य कॉलेज परिसरात फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थी हा मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी तेथे आलेल्या सात ते आठ युवकांनी त्याला शिवीगाळ करत पैशाची मागणी केली. तसेच त्यातील एकाने कोयता उगारून युवकाच्या खिशातील पाकिट, हातातील घड्याळ काढून घेतले आणि इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संबंधित संशयतांनी ‘आम्ही शाहूपुरीचे डॉन आहोत,आम्हाला पैसे देत नाहीस म्हणत तक्रारदार यास चांगला चोचपला, त्याचे हातपाय तोडा म्हणजे त्याला आपल्या बकासुर गॅंगची दहशत कळेल’ असे जोरात ओरडून तक्रारदार युवकाजवळ असलेल 1,340 रुपयाचे साहित्य आणि पाकिट हिसकावून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन मुले अल्पवयीन आहेत. या टोळीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shahupuri police arrested Bakasur gang which was terrorizing Satara)