Sharad Mohol Murder | शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट समोर, मोहोळ संपवण्यासाठी नाही बोलला म्हणून मामा-भाचाने…
Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येत आहे. आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी डिसेंबरमध्ये मुळशीमधील भूगावमध्ये मोठा राडा केलेला.
योगेश बोरसे, पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे मोहोळ याच्या घराजवळच त्याची गोळ्या झाडून हत्या करण्याता आली होती. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने पुणे हादरून गेलेलं. जवळच्या साथीदाराने एकदम फुलफ्रुफ प्लॅन बनवत मोहोळ याला संपवलं. भाच्याने मामासाठी मोहोळच्या टोळीत जात संधी मिळताच त्याला संपवलं. मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे हा मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. अशातच या प्रकरणामध्ये आणखी मोठी माहिती समोर आली आहे.
शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत करत नाही म्हणून मामा-भाचांनी मुळशीतील भूगावमधील एकावर गोळीबार केला होता. साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी 17 डिसेंबरला गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबरमध्येही शरद मोहोळ याला मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. भूगावमधील नेमक्या कोणावर नामदेव कानगुडे आणि साहिल पोळेकर यांनी गोळीबार केला गेला त्याचं याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
या प्रकरणामध्ये आरोपी पोळेकर आणि कानगुडे यांनी मध्य प्रदेशमधून पिस्तुल घेतल्याची माहिती आहे. धनंजय वटकर आणि सतीश शेडगे यांनी ही शस्त्रे मागवली होतीत. त्यांनाही पोलिसांनी अटक केली असून मध्य प्रदेशमधून नेमकी कोणी शस्त्र पुरवलीत याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी आरोपी असलेल्या वकिलांना या हत्येची आधीच माहिती असल्याचा दावा केला आहे.
मोहोळला कसा संपवला?
दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती, आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.