ती प्रियकरासोबत पळून गेली, गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा, नवरा नाच नाच नाचला
हा सारा प्रकार घडत असताना काही गावकरी नाचू लागले. त्या महिलेचा नवराही त्यांच्यात सामील झाला आणि बेफाम नाचू लागला. या घटनेचा काहींनी व्हिडीओ बनवून तो सोशम माध्यमावर व्हायरल केला.
गुजरात : गुजरातमधील आदिवासीबहुल दाहोद जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे गावातीलच एका तरुणासोबत सूत जुळले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर ते दोघेही कुणालाही काही कळू न देता गावातून पळून गेले. काही दिवसांनी ते दोघे पुन्हा भागवत आले. त्यांना पाहून गावकऱ्यांच्या रंगाचा पारा चढला. त्यांनी त्या महिलेसह तरुणाला तालिबानी शिक्षा दिली. मात्र, त्यांना ही शिक्षा होताना त्या महिलेचा नवरा गावकऱ्यासोबत नाच नाच नाचला. दरम्यान हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून त्यांनी दोषींवर कारवाई केली आहे.
आदिवासीबहुल दाहोद गावातील एक विवाहित महिलेचे एका तरुणासोबत प्रेम संबंध जुळले. ते दोघे गावातून पळून गेले. काही दिवसांनी ते दोघे पुन्हा गावात आले. मात्र, त्या दोघांना पाहून गावकरी संतापले. प्रियकरासह पळून गेलेल्या त्या महिलेला लोकांनी मारहाण केली. तर, प्रियकराला मोठी शिक्षा केली.
गावकऱ्यांनी त्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला गावाच्या मध्यभागी उभे केले. त्यानंतर काहींनी त्या महिलेची साडी ओढून काढली. तीच साडी प्रियकराच्या डोक्यावर बांधली आणि त्या दिघंची गावातून धिंड काढली.
गावकरी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी महिलेला जमिनीवर आडवे पाडत गाव प्रदक्षिणा घालायला लावली. महिलेला जमिनीवर ओढले आणि गावात फिरायला लावले. तर, त्या तरुणाला आधी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. त्यापुढे जाऊन त्यांनी प्रियकराला झाडाला लटकवले. त्यानंतर झाडाला आग लावली.
हा सारा प्रकार घडत असताना काही गावकरी नाचू लागले. त्या महिलेचा नवराही त्यांच्यात सामील झाला आणि बेफाम नाचू लागला. या घटनेचा काहींनी व्हिडीओ बनवून तो सोशम माध्यमावर व्हायरल केला. हा व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्या महिलेला आणि तरुणाला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले.
पोलिसांनी त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेचा तपास करून व्हिडिओच्या आधारे ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला असून ते सातत्याने अहवाल घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.