धक्कादायक! साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा, दुबईतून अटक केलेल्या अतिरेक्यांकडून खळबळजनक कबुली

Gujrat ATS & Shirdi : करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिलेल्या या कबुलीनं एकच खळबळ उडाली आहे. गुजरात एटीएसनं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेची संबंधित असलेल्या अतिरेक्यांना ताब्यात घेतलं होतं.

धक्कादायक! साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा, दुबईतून अटक केलेल्या अतिरेक्यांकडून खळबळजनक कबुली
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 10:05 AM

शिर्डी : शिर्डीवर अतिरेकी कट (Terrorist done reiki in Shirdi) रचला जाण्याच्या इराद्यानं रेकी केल्याची धक्कादायक कबुली अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिली आहे. दुबईत अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिलेल्या या कबुलीनं एकच खळबळ उडाली आहे. गुजरात एटीएसनं (Gujrat ATS) पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेची संबंधित असलेल्या अतिरेक्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यानंतर आता असंख्य लोकांना श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी शिर्डीवर (Shirdi Sai baba Temple) दहशतवाद्यांचा डोळा होता, ही बाबही समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या अतिरेक्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. ज्या दहशतवादी संघटनेशी हे अतिरेकी संबंधित आहे, ती संघटना पाकिस्तानातील असल्याची माहिती गुजरात एटीएसनं दिली आहे.

फक्त शिर्डीतच नव्हे तर एका हिंदी वाहिनीच्या संपादकाच्या घराची आणि कार्यालयाचीही रेकी या अतिरेक्यांनी केली असल्याचं तपासासून समोर आलं असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. गुजरात एटीएसनं या दहशतवाद्यांकडन अवैध शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली असल्याचं सांगितलं जातंय. याआधीही अनेकदा शिर्डी संस्थानला धमकीचे फोन आणि मेल आल्याचं पाहिलं देलं आहे. अशातच आता समोर आलेल्या माहितीनंतर मंदिर प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे.

गुजरात एटीएसकडून अटक

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने काही अतिरेक्यांना अटक केली होती. दुबईतून या अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्याकडून शिर्डी येथील मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी न्यूज चॅनेलचे संपादक यांच्या दिल्ली येथील सुदर्शन टिव्हीचे कार्यालय आणि शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली दिली आहे.

सुरक्षेत वाढ

या घटनेनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेल्या आरोपी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी सुरेश चव्हाणके यांच्या मुळगाव शिर्डी येथील घराची रेकी केली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. .

या जिहादी अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटकं तसेच गोळाबारुद आढळून आलं आहे. गुजरात एटीएसनं केलेल्या दाव्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांचं पाकिस्तान दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जातंय. आता अटर करण्यात आलेल्या सगळ्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या खळबळजनक कबुलीनंतर आता शिर्डीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शिर्डीत खळबळ

याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवीसह दोघांना, अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. सर्व आठ जणांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीसारख्या अती संवेदनशील ठिकाणी दहशतवादी संघटनेचे लोक येऊन रेकी करून जातात, पण याबाबत पोलीस यंत्रणेला काहीच कळत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

संबंधित बातम्या :

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईंच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी

Shirdi Sai Baba | साई बाबांच्या पूजेचा महाउपाय, हा उपाय केल्याने दूर होतील सर्व संकटं

#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.