वेग कंट्रोलच्या बाहेर, ट्रक समोरसोरच भिडले! ट्रकसह दोन्ही चालकांच्या शरीराचाही चेंदामेंदा

हा अपघात इतका भयंकर होता की अपघातामध्ये दोन्ही ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.

वेग कंट्रोलच्या बाहेर, ट्रक समोरसोरच भिडले! ट्रकसह दोन्ही चालकांच्या शरीराचाही चेंदामेंदा
भीषण अपघात..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 12:28 PM

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात (Truck Accident) झाला. दोन ट्रक एकमेकांना समोरासमोरच भिडले आणि अपघात घडला. हा अपघात इतका भीषण (Shirdi Accident News) होता की दोन्ही ट्रकचा तर चेंदामेंदा झालाच. पण ट्रकमध्ये असलेल्या चालकांनाही जबर मार बसून त्यांच्यावरही काळानं घाला घातला. या अपघातामुळे बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकांना शिस्त कधी लागणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

राहता तालुक्यातील लोणी-कोल्हार मार्गावर दोन मालवाहू ट्रकची जबरदस्त धडक झाली. समोरासमोर धडक झाल्यामुळे या दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी जबर होती की दोन्ही मालवाहू ट्रकच्या चालकांचाही जागच्या जागी मृत्यू झाला. संतोष राख आणि सुनील जायभाये अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावं आहेत.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे लोणी-कोल्हार मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आली.

हे सुद्धा वाचा

मालवाहू ट्रकच्या अपघातामुळे अवजड वाहनं बेदरकारपणे चालवणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तसंच राज्यातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचंही यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळतंय. या अपघाताची पोलिसांनी नोंद करुन घेतली असून पुढील तपास केला जातो आहे.

विनायक मेटे, सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. बेशिस्तपणे वाहनं चालवणं, लेन तोडणं, ओव्हरटेकिंगचा नाद, वेगाची मर्यादा न पाळणं, ही अपघात वाढण्याची प्रमुख कारणं असल्याचंही अभ्यासातून समोर आलं होतं.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.