घरगुती वाद विकोपाला, शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारासोबत पीडिता पोलीस ठाण्यात

एकनाथ पाटील यांची सून हर्षदा या घटनेनंतर मदत मागण्यासाठी  आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेली. | Shivsena leader daughter in law

घरगुती वाद विकोपाला, शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजप आमदारासोबत पीडिता पोलीस ठाण्यात
एकनाथ पाटील आणि हर्षदा पाटील
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 2:25 PM

कल्याण: घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याची घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही शिवसेनेची पदाधिकारी असून हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओच्याआधारे सूनेने आपल्या सासऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील (Eknath Patil) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. (Shivsena leader into controversy due to accusations by daughter in law)

मात्र, हा व्हिडिओ जुना असून हे सर्व कटकारस्थान भाजप पदाधिकाऱ्याचे असून सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी केला आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाला राजकीय वळणही लागण्याची शक्यता आहे. एकनाथ पाटील यांची सून हर्षदा या घटनेनंतर मदत मागण्यासाठी  आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेली. त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक रीना माळी आणि हर्षदा यांच्यासह पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना हा सगळा प्रकार सांगत रवींद्र चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या व्हीडिओची सत्यता पडताळून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

एकनाथ पाटील काय म्हणाले?

माझा सूनेशी काहीही वाद नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. हा जुना व्हीडिओ आहे. मला भाजपकडून याप्रकरणात नाहक गोवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

एकनाथ पाटील सूनेला नेहमी मारहाण करायचे?

एकनाथ पाटील हे कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात वास्तव्याला आहेत. हर्षदा पाटील या त्यांच्या सूनबाई आहेत. एकनाथ पाटील हे आपल्याला नेहमी मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचे हर्षदा पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच अनेकदा ते आपल्या मुलीच्या अंगावरही धावून गेले आहेत, असे हर्षदा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आपण या सगळ्याविरोधात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ पाटील यांच्याविरोधात कोणीही त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही. अगदी पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यामुले आपण पुराव्यासाठी एकनाथ पाटील आपल्या तोंडावर थुंकतानाचा व्हीडिओ तयार केल्याचा दावा हर्षदा पाटील यांनी केला.

इतर बातम्या:

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

बॉलिवूड फोटोग्राफरकडून बलात्कार, आठ जणांकडून विनयभंग, 28 वर्षीय मॉडेलच्या आरोपांनी खळबळ

सोसायटीचे गेट उघडायला उशीर झाल्याने तरुणाकडून बुलेटच्या चैनने वॉचमनला अमानुषपणे मारहाण

(Shivsena leader into controversy due to accusations by daughter in law)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.