‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला चपलेनं हाणलं

आयटम चाहीये?, असं म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते, असं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.

'आयटम चाहीये, तुझे? हांss..' म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला चपलेनं हाणलं
शिवसेना विभागप्रमुखाला मारहाण करणारी महिला
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 8:52 AM

विरार : विरार पूर्वेतील साईनाथ नगर (Sainath Nagar, Virar East) इथं असलेल्या शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं चपलेनं चांगलंच हाणलंय. जितू खाडे असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चपलेनं चोपलं आहे. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याच कारणानं संतप्त महिलेनं जितू खाडे (Jitu Khade) याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनंच चोप दिलाय. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेनं चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जातोय.

नेमका काय प्रकार?

आयटम चाहीये?, असं म्हणत एक महिला शिवसेना विभागप्रमुख असलेल्या जितू खाडे याला चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते, असं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

याप्रकरणी विरार पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिका-याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे हा सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या त्याचा शोध घेतला जात असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शिवसेनेचं काय म्हणणं?

दरम्यान, या संपूर्ण घटनेप्रकरणी शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांना फोनवरून विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी या कृतीचा निषेध केलाय. तसंच जितू खाडे असता त्यांनी या कृतीचा निषेध व्यक्त केला असून, जितू खाडे च्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असं सांगितलं आहे. एकूणच या प्रकरणामुळे शिवसेना विभागप्रमुखाचं नाव आल्यानं आता पक्षाकडून जितू खाडेवर काय कारवाई होते, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?

चित्रपट पाहून अपहरणाचा प्लॅन, रागाच्या भरात मित्रासोबत केलं भयंकर काम, दिल्लीमध्ये थरार

गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.