लफडं महागात पडलं… भावाने प्रियकरासोबत पाहताच थेट बाईकसोबत मोठ्या खड्ड्यात घेतली उडी; नंतर ज्याची भीती होती तेच घडलं…
दोन्ही बाईकचा वेग खूप होता. त्याच दरम्यान, प्रियकराने आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात लोटून दिली.
UP Shocking Crime : उत्तर प्रदेशातील (UP) बिजनौरमधून एक खळबळजनक आणि वेदनादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक तरूणी तिच्या प्रियकरासोबत (boyfriend) फिरताना तिच्या भावाने तिला पाहिलं. मग काय, बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडण्यासाठी भावाने बहिणीच्या प्रियकराच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. आता परिस्थिती अशी होती की पुढे त्या तरूणाची आणि मागे त्या मुलीच्या भावाची बाईक धावत होती.
दोन्ही बाईकचा वेग खूप होता. दरम्यान, प्रियकराने आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात लोटून दिली. दुचाकीचे संतुलन बिघडले आणि मुलगी खाली पडली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर प्रियकराने स्वत: दुचाकीवरून उडी मारून पळ काढला.
भावाने केला बहिणीच्या बॉयफ्रेंडचा पाठलाग
जेव्हा भावाने आपल्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत बाईकवर फिरताना पाहिले तेव्हा प्रियकराने त्याच्या गाडीचा वेग वाढवला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात लोटून दिली. खरं तर, ती बिजनौरच्या सेओहरामध्ये तिच्या प्रियकरासोबत बाजारात फिरत होती, तेव्हा तिच्या भावाने तिला पाहिले आणि तिचा पाठलाग करू लागला.
प्रियकर झाला फरार
प्रियकराने गाडीचा वेग वाढवला आणि त्याचा तोल गेला. त्यामुळे गाडीसह मोठ्या खड्ड्यात उडी मारली. दुचाकीवरून पडल्याने त्या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या प्रियकराने तेथून पळ काढला, तो अद्याप फरार आहे. पोलीस सध्या मृत तरूणीच्या भावाची चौकशी करत आहेत.